कलमठ बिडयेवाडी येथील नदीवर पूल बांधण्यात यावा

भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री यांची ना. चव्हाण यांच्याकडे मागणी

⚡कणकवली ता.२७-: कलमठ गावामधून जानवली नदी जात असल्याने गावाचे दोन भाग झाले आहेत. गावातील ग्रामदैवत श्री कलेश्वर मंदिर व ग्रामपंचायत कार्यालय तसेच इतर महत्त्वाच्या कार्यालयांमध्ये जाण्यासाठी ग्रामस्थांना कणकवली शहरामध्ये येऊन वळसा घेऊन जावे लागते. गावाची लोकसंख्या सुमारे १२००० च्या आसपास आहे. त्यामुळे कलमठ बिडयेवाडी गावडेवादी येथील नदीपात्रावर पूल व्हावा, अशी ग्रामस्थांची मागणी आहे. सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आलेल्या सार्वजनिक बांधकाममंत्री रविंद्र चव्हाण यांच्याकडे या मागणीचे निवेदन आ. नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री यांनी दिले.

यावेळी भाजपा युवा मोर्चा संघटन सरचिटणीस संदीप मेस्त्री, माजी पं. स. सदस्य महेश लाड, भाजपा शक्तिकेंद्रप्रमुख विजय चिंदरकर, स्वप्नील चिंदरकर, बाबू नारकर उपस्थित होते.

You cannot copy content of this page