⚡कणकवली ता.२७-: राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण हे सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल होताच कणकवली विश्रामगृहावर बांधकाम मंत्र्यांची शिवसेनेचे नगरसेवक रुपेश नार्वेकर यांनी सदिच्छा भेट घेतली. या भेटीमुळे सर्वांच्याच भुवया मात्र उंचावल्या.
मात्र याबाबत रुपेश नार्वेकर यांच्याशी संपर्क साधला असता रवींद्र चव्हाण यांच्याशी माझे अत्यंत जवळचे पूर्वीपासून संबंध असून, रवींद्र चव्हाण हे मंत्री झाल्यानंतर ते पहिल्यांदाच सिंधुदुर्ग जिल्ह्यात आल्याने त्यांची ही सदिच्छा भेट घेतली असे श्री नार्वेकर यांनी सांगितले. यावेळी जिल्हा बँक उपाध्यक्ष अतुल काळसेकर, भाजपा कार्यकर्ते महेश सावंत, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख बबलू सावंत, अमित मयेकर आदी उपस्थित होते.
शिवसेनेचे नगरसेवक रुपेश नार्वेकर यांनी घेतली रवींद्र चव्हाण यांची भेट
