⚡कणकवली ता.२७-: राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र रवींद्र चव्हाण हे मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल झाले. यावेळी शिवसेना शिंदे गटाकडून कणकवलीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात नाम. रवींद्र चव्हाण यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले.
यावेळी माजी जि. प. सदस्य संजय आंग्रे यांच्या हस्ते शाल व परमपूज्य भालचंद्र महाराज यांची प्रतिमा देऊन रवींद्र चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांशी रवींद्र चव्हाण यांनी काही मिनिटे चर्चा देखील केली. याप्रसंगी माजी जि. प. सदस्य संजय आंग्रे, माजी सभापती संदेश पटेल, माजी नगरसेवक भूषण परुळेकर, भास्कर राणे, सुनील पारकर, बाळू पारकर, दीपक राऊत, दिलीप घाडीगावकर, सुनील हरमळकर, दामू सावंत, शेखर राणे, अनिल खोचरे, बाबू आचरेकर, राजन म्हाडगुत, निलेश तेली आदी अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी शिंदे गटाकडून फटाक्यांची जोरदार आतशबाजी करत श्री चव्हाण यांचे स्वागत करण्यात आले.
कणकवलीत शिवसेना शिंदे गटाने नाम. रवींद्र चव्हाण यांचे केले स्वागत
