गोट्या सावंत व समीर नलावडे व भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती
⚡कणकवली ता.२७-: सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण हे मुंबई गोवा महामार्गाची पाहणी करण्याकरता सिंधुदुर्ग दौऱ्यावर असताना त्यांचे कणकवली येथील आप्पासाहेब पटवर्धन चौक येथे माजी जि.प.अध्यक्ष संदेश सावंत व कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्यासह भाजपा कार्यकर्त्यांनी जगी स्वागत केले.
यावेळी माजी जि.प. अध्यक्ष संदेश सावंत, कणकवलीचे नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, पंचायत समिती सदस्य मिलिंद मेस्त्री, नगरसेवक संजय कामतेकर, अभी मुसळे, अण्णा कोदे, उमेश घाडीगावकर, संदीप मेस्त्री, शशी राणे, संदीप सावंत, गणेश तळगावकर, पंढरी शिरवलकर, समीर प्रभूगावकर, लक्ष्मण घाडीगावकर, महेश शिरवलकर, राजन परब , राजश्री धुमाळे आदी भाजपा कार्यकर्त्यांसह पदाधिकारी महिला उपस्थित होते.
