आंतर-महाविद्यालयीन सांस्कृतिक युवा महोत्सवात कणकवली महाविद्यालयाचे यश

⚡कणकवली ता.२७-:
मुंबई विद्यापीठामार्फत आयोजित ५५ व्या आंतर-महाविद्यालयीन सांस्कृतिक युवा महोत्सवामध्ये कणकवली महाविद्यालयाने विविध नऊ कलाप्रकारामध्ये घवघवीत यश संपादन करून महाविद्यालयाचा ठसा उमटविला आहे.
सदर विभागीय निवड स्पर्धा संत राऊळ महाराज महाविद्यालय, कुडाळ येथे दिनांक नुकतीच रोजी पार पडली. या स्पर्धेमध्ये यशस्वी संघांना मुंबई विद्यापीठ, मुंबई येथे अंतिम फेरीच्या स्पर्धेसाठी संधी दिली जाते. यामध्ये कणकवली महाविद्यालयाच्या स्पर्धकांनी एकांकिका (मराठी), प्रहसन (मराठी), भारतीय लोकनृत्य या सामूहिक कलाप्रकारांमध्ये यश संपादन केले. तर वैयक्तिक कलाप्रकारांमध्ये कु. रिद्धी अमोल मोरवेकर – मिमिक्री, कु. प्रेरणा प्रदीप चिंदरकर – कथाकथन, (इंग्रजी), कु. मृणाल मिलिंद गावकर – कथाकथन (मराठी) कु. वेदांत मंगेश कुयेस्कर – तबलावादन, कु. सलोनी महेश मेस्त्री-भारतीय सुगम गायन तर कु. प्रतिभा किशोर परब आणि कु. रश्मी रवींद्र साटम – वादविवाद (हिंदी) हे कलाप्रकार अंतिम फेरीसाठी पात्र ठरले आहेत.
स्पर्धेसाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. युवराज महालिंगे, प्रा. हरिभाऊ भिसे, प्रा. डॉ. मारोती चव्हाण, प्रा.मीनाक्षी सावंत, प्रा.सीमा हडकर, प्रा.सचिन दर्पे, प्रा.दीपा तेंडोलकर, प्रा.स्वीटी जाधव, प्रा.अरविंद उमरीकर आणि श्री विलास कदम यांचे मार्गदर्शन लाभले.
कणकवली महाविद्यालयाने प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी सांस्कृतिक विभागात मानाचा तुरा रोवल्याबद्दल सर्व यशस्वी विद्यार्थी कलावंत व मार्गदर्शक यांचे शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्षश्री दत्तात्रय तवटे,चेअरमन डॉ. राजश्री साळुंखे, सचिव विजयकुमार वळंजू, विश्वस्त व सर्व संस्था पदाधिकारी, प्रभारी प्राचार्य डॉ. राजेंद्रकुमार चौगुले व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

.

You cannot copy content of this page