युवा महोत्सवात सिंधुदुर्ग महाविद्यालयाचे यश

⚡मालवण ता.२७-:
कुडाळ येथे पार पडलेल्या मुंबई विद्यापीठाच्या ५५ व्या युवा महोत्सवात मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी चार विभागात यश संपादन केले. या यशस्वी विद्यार्थ्यांचा महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात प्राचार्या डॉ. उज्वला सामंत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

युवा महोत्सवामध्ये लोकनृत्य स्पर्धा- तृतीय क्रमांक- रीना जितेंद्र मराळ, तेजस संतोष कातवणकर, विजया राजन कांदळगावकर, मोरवेकर मिथिल जितेंद्र मोर्वेकर, चैतन्य उदय ठाकूर, तेजस विजय पोळ, दिपशिखा रवींद्र रेवंडकर, राहुल संतोष जाधव, श्रुती अरविंद राऊळ, धनेश्वरी मिलींद लाड, नृत्य दिग्दर्शक- भूषण पाटील, रोहित माने. तालवाद्य स्पर्धा- द्वितीय क्रमांक- रथराज धोंडू तुरी. रांगोळी स्पर्धा- द्वितीय क्रमांक -ममता दत्तात्रय वायंगणकर, वक्तृत्व स्पर्धा- ग्रुप B हिंदी – प्रथम क्रमांक – शर्मा निकिता रामनारायण या विद्यार्थ्यांनी यश मिळविले. या विद्यार्थ्यांना तसेच सांस्कृतिक विभागाचे प्रा.हंबीरराव चौगले, प्रा.प्रमोद खरात, प्रा.वैशाली पाटकर यांचा प्राचार्यांच्या हस्ते सत्कार करून गौरविण्यात आले.

You cannot copy content of this page