Headlines

भाजपाच्या वतीने शिक्षिकाप्राजक्ता आपटे यांचा सन्मान….

⚡वेंगुर्ला ता.०८-: सिंधुदुर्ग जि. प. ‘आदर्श शिक्षक’ पुरस्कारासाठी वेंगुर्ला तालुक्यातील प्राजक्ता आपटे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा भाजपाच्या वतीने मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मान करण्यात आला. शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
अध्यापनासोबतच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच शैक्षणिक गुणवत्ता वृद्धिंगत करण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांचे यावेळी कौतुक करण्यात आले. शिक्षक म्हणून त्यांनी बजावलेली प्रभावी भूमिका आणि शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाची दखल घेत मिळालेला हा सन्मान त्यांच्या कार्याला मिळालेली महत्त्वपूर्ण पावती असल्याचे नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी नमूद केले.
पुरस्कारासाठी झालेल्या निवडीबद्दल उपस्थित मान्यवरांनी आपटे यांचे अभिनंदन केले.
यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई, वेंगुर्ला नगराध्यक्ष दिलीप गिरप, शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, नगरसेविका गौरी मराठे , नगरसेवक प्रशांत आपटे, नगरसेवक रविंद्र शिरसाट , वेताळ प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. सचिन परुळकर, प्रा. सदाशिव सणगर, संजय पुनाळेकर , दिनेश तानावडे आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page