प्रदेशाध्यक्ष आ. रविंद्र चव्हाण व पालकमंत्री ना. नितेश राणे यांची प्रमुख उपस्थिती
सावंतवाडी ता.०९-: भारतीय जनता पक्षाची विस्तारित जिल्हा कार्यकारिणी बैठक सावंतवाडी नगर परिषदेच्या बॅरिस्टर नाथ पै सभागृहात आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रतिमा पूजन व त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यकारीणीचा भव्य शुभारंभ करण्यात आला. यानंतर राष्ट्रगीत व राज्यगीत गायन करण्यात आले.
यावेळी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आ. रविंद्र चव्हाण, राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकासमंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे, प्रदेश सरचिटणीस आ. निरंजन डावखरे, आ. योगेश सागर, प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, आ. प्रमोद जठार, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, महिला जिल्हाध्यक्षा सौ. श्वेता कोरगावकर,
संघटन मंत्री शैलेंद्र दळवी, माजी आमदार अजित गोगटे, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी,
भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष युवराज लखमराजे भोंसले, नगराध्यक्षा सौ. श्रद्धाराजे भोंसले, उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर, जिल्हा उपाध्यक्ष महेश सारंग, संदीप गावडे, विशाल परब, जिल्हा सरचिटणीस संदीप साटम, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, तालुका मंडल अध्यक्ष मधुकर देसाई, संतोष राऊळ, शहर मंडल अध्यक्ष सुधीर आडिवरेकर, महिला शहर अध्यक्षा सौ. मोहिनी मडगावकर, जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष रणजित देसाई, वेंगुर्ले नगराध्यक्ष राजन गिरप, पंचायत समिती उपसभापती गौरव मुळीक, महेश धुरी, राजू राऊळ, बाळू देसाई, दिलीप भालेकर, संतोष तळवणेकर आदी उपस्थित होते.
