महामार्ग च्या वागदे तील अपघातग्रस्त ठिकाणी केली पाहणी
⚡कणकवली ता.२७-:
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री नाम. रवींद्र चव्हाण सिंधुदुर्गात दाखल झाल्यानंतर कणकवलीमध्ये महामार्गावर वागदे येथे अपघात झालेल्या ठिकाणी शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी देखील रवींद्र चव्हाण यांची भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली. महामार्गाच्या संदर्भात प्रश्न मांडत असतानाच आतापर्यंत महामार्गावर अपघात होऊन मृत्यू झालेल्या यांच्या कुटुंबीयांना मदत द्या अशी मागणी आमदार वैभव नाईक यांनी यावेळी रवींद्र चव्हाण यांच्याकडे केली.
