Headlines

पाट हायस्कूलमध्ये खाद्य उत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद

विद्यार्थी आणि पालक यांनी तयार केले विविध खाद्यपदार्थ कुडाळ : खाद्यपदार्थ विक्रीवर शालेय परिसरात विविध निर्बंध आल्यामुळे मुलांना आरोग्यासाठी चांगले खाद्य कोणते हे समजावे म्हणून इको क्लब आणि हरित सेना स्कूलच्या वतीने खाद्य उत्सव घेण्यात आला. यामध्ये मुलांनी आणि पालकांनी बऱ्याच वस्तूंची निर्मिती केली आणि विक्री ही केली. एका तासामध्ये तब्बल पंधरा हजारापर्यंत खाद्यपदार्थांच्या वस्तूंची…

Read More

उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत पाट हायस्कूलचे उल्लेखनीय यश

कुडाळ : एस .के .पाटील शिक्षण प्रसारक मंडळ पाट पंचक्रोशी संचलित एस.एल.देसाई विद्यालयाच्या तीन विद्यार्थ्यांनी उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत (इयत्ता -सातवी)उल्लेखनीय असे यश संपादन करून प्रशालेची मान उंचावली आहे. यामध्ये भार्गव शंकर पेडणेकर यांने जिल्ह्यात द्वितीय क्रमांक पटकावून राष्ट्रीय ग्रामीण शिष्यवृत्ती प्राप्त केली आहे. भक्ती योगेश तेलीकोचरेकर व विघ्नेश अमर सावंत या विद्यार्थ्यांना ग्रामीण सर्वसाधारण…

Read More

पत्रादेवी हुतात्मा स्मारकाचे २५ ऑगस्टला उद्घाटन…

बांदा ता.१३-:गोवा स्वातंत्र्य संग्रामात सिंधुदुर्गातील विशेषतः बांदा परिसरातील स्वातंत्र्यसैनिकांचे योगदान अत्यंत मोलाचे राहिले आहे. पत्रादेवी सीमाभाग हा गोवा मुक्ती लढ्याचा महत्त्वाचा साक्षीदार ठरला असून या लढ्यातील हुतात्म्यांच्या स्मृती जतन करण्यासाठी उभारण्यात आलेल्या पत्रादेवी येथील हुतात्मा स्मारकाचे उद्घाटन येत्या २५ ऑगस्ट रोजी देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांच्याहस्ते करण्यात येणार असल्याची माहिती गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत…

Read More

बांदा विकास संस्थेची कर्जवसुलीत शंभर टक्के कामगिरी

बांदा/प्रतिनिधीबांदा विकास संस्थेने कर्जवसुलीत शंभर टक्के यश संपादन करून उल्लेखनीय कामगिरी केली आहे. संस्थेच्या या यशाबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने विशेष गौरव करण्यात आला.संस्थेचे अध्यक्ष राजाराम उर्फ बाळू सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच कर्जदार सभासद आणि संचालक मंडळाच्या सहकार्यामुळे ही कामगिरी शक्य झाली. आर्थिक शिस्त, नियमित कर्जफेड आणि सभासदांच्या सक्रिय सहभागाच्या बळावर संस्थेने आदर्शवत…

Read More

कवयित्री मनीषा पाटील यांच्या ‘काहूर’ कवितासंग्रहाचा रविवारी कणकवलीत प्रकाशन सोहळा

कणकवली :समाज साहित्य प्रतिष्ठान (सिंधुदुर्ग) आणि ‘मिळून साऱ्याजणी’ परिवार (कणकवली) यांच्या संयुक्त विद्यमाने कवयित्री मनीषा पाटील लिखित व ‘रावा प्रकाशन’ प्रकाशित ‘काहूर’ या दुसऱ्या कवितासंग्रहाचा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम रविवार, १६ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १०:३० वाजता कणकवली येथील वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या नाट्यगृहात पार पडणार आहे. साहित्य अकादमी पुरस्कार विजेते कादंबरीकार…

Read More

वामनराव महाडिक विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा

प्रा. अन्वी गवाणकर यांचा जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत तृतीय क्रमांक कणकवली :तळेरे येथील वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या मराठी व इतिहास विषयाच्या शिक्षिका प्रा. अन्वी गवाणकर यांनी हुतात्मा मेजर कौस्तुभ राणे यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावला आहे. त्यांच्या या यशामुळे प्रशालेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.अध्यापन क्षेत्रात…

Read More

मोती तलावातील पाणी दूषित..

तातडीने उपाययोजना करा: माजी नगरसेवक सुरेश भोगटे यांची मागणी.. ⚡सावंतवाडी ता.१३-: शहराची ओळख असलेल्या मोती तलावातील पाणी सांडपाणी व गटाराच्या पाण्यामुळे दूषित होत असल्याने त्याची तातडीने स्वच्छता करून योग्य ती उपाययोजना करावी, अशी मागणी सावंतवाडी माजी नगरसेवक सुरेश भोगटे यांनी केली आहे.याबाबत माजी नगरसेवक सुरेश भोगटे यांच्यासह नागरिकांनी सावंतवाडी नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. निवेदनात…

Read More

मुख्याधिकारी गौरी पाटील यांच्या कामाचे माजी नगराध्यक्षांकडून समर्थन…

२१ टेंडर प्रकरणात घेतलेली हरकत नियमानुसारच:जिल्हाधिकाऱ्यांकडील सुनावणीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष.. ⚡कणकवली ता.१३-:कणकवली नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी गौरी पाटील यांच्याविरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आलेल्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर, माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी त्यांच्या कामकाजाचे ठाम समर्थन केले आहे. गेल्या आठ ते नऊ महिन्यांच्या कालावधीत गौरी पाटील यांनी नगरपंचायतीचा कारभार अत्यंत सक्षमपणे सांभाळला असून, त्यांच्या प्रशासकीय कामकाजात कोणतीही गंभीर चूक झालेली…

Read More

तिरंगा रॅलीतून कुडाळात देशभक्तीचा उत्साह शिगेला…

पालकमंत्री नितेश राणे, आम. निलेश राणेंचा सहभाग:राष्ष्ट्रप्रेमी नागरिक मंचाचे नेटके आयोजन.. ⚡कुडाळ ता.१३-: भारताच्या ८० व्या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर आज कुडाळ शहरातून राष्ट्रप्रेमी नागरिकांच्या वतीने काढण्यात आलेल्या तिरंगा रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. भारत माता कि जय, वंदे मातरम, जय जवान जय किसान, छत्रपती शिवाजी महाराज कि जय, हर हर महादेव, जय भवानी जय शिवाजी अशा…

Read More

वेंगुर्ला न.प. मार्फत हर घर तिरंगा अभियान अंतर्गत “तिरंगा रॅली “उत्साहात….

वेंगुर्ला‘घरो घरी तिरंगा’ अभियानांतर्गत वेंगुर्ला नगरपरिषदमार्फत आज गुरुवारी ” तिरंगा रॅली ” स उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. वेंगुर्ला नगरपरिषद कार्यालय येथून नगराध्यक्ष दिलीप उर्फ राजन गिरप यांच्या हस्ते झेंडा दाखवून रॅलीचा शुभारंभ करण्यात आला. ही तिरंगा रॅली वेंगुर्ला नगरपरिषद येथून सुरू होऊन वेंगुर्ला बाजारपेठ, पोस्ट ऑफिस स्टॉप, पिराचा दर्गा स्टॉप, श्री रामेश्वर मंदिर स्टॉप, लौकीक हॉटेल…

Read More
You cannot copy content of this page