Headlines

गुरू-शिष्याच्या स्नेहबंधाला उजाळा…

भाजप प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण यांना युवा नेते विशाल परब यांच्या यांच्याकडून वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..

⚡सावंतवाडी ता.२०-: महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व करणारे भाजपचे युवा नेते विशाल परब यांनी मुंबई येथे प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना मनःपूर्वक वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

विशाल परब हे रवींद्र चव्हाण यांना आपले राजकीय गुरु मानतात. त्यामुळे वाढदिवसानिमित्त झालेली ही भेट केवळ शुभेच्छांपुरती मर्यादित न राहता गुरु-शिष्याच्या जिव्हाळ्याच्या नात्याची प्रचिती देणारी ठरली. विशाल परब यांनी पुष्पगुच्छ देऊन रवींद्र चव्हाण यांचे अभिनंदन केले. तसेच आपुलकीने पेढा भरवून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी दोघांमध्ये झालेला स्नेहपूर्ण संवाद उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होता.
रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनातून राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात काम करण्याची दिशा व प्रेरणा मिळत असल्याची भावना विशाल परब यांनी यावेळी व्यक्त केली. समाजासाठी कार्य करताना गुरुंचे मार्गदर्शन आणि आशीर्वाद महत्त्वाचे असल्याचेही त्यांनी सांगितले.
रवींद्र चव्हाण आणि विशाल परब यांच्यातील गुरु-शिष्याचे नाते राजकीय क्षेत्रातील मार्गदर्शन, स्नेह आणि विश्वासाचे प्रतीक मानले जाते. वाढदिवसानिमित्त झालेल्या या भेटीतून या नात्यातील आपुलकी पुन्हा एकदा अधोरेखित झाली.

You cannot copy content of this page