वेंगुर्ला
वेंगुर्ला एस. टी. आगारासाठी आ. दिपक केसरकर यांनी केलेल्या तातडीच्या पाठपुराव्यानंतर 5 जिजाऊ एसटी बसेस प्राप्त झाल्या आहेत. यामधील 3 बसेसचे लोकार्पण आज शनिवारी सायंकाळी आ. दिपक केसरकर, नगराध्यक्ष दिलीप उर्फ राजन गिरप व वेंगुर्ला पं. स. उपसभापती सचिन देसाई यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. या बसेस प्राप्त झाल्याने आ. दिपक केसरकर यांनी परिवहन मंत्री यांचे आभार व्यक्त केले. यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष तथा सेवा शक्ती आगार अध्यक्ष प्रसन्ना उर्फ बाळू देसाई,
कार्याध्यक्ष तथा
भाजपा तालुकाध्यक्ष विष्णू उर्फ पप्पू परब, सेवा शक्ती संघर्ष एस. टी. कर्मचारी संघ राज्य उपाध्यक्ष भरत चव्हाण,
आगार सचिव
दाजी तळवणेकर,
शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, वेंगुर्ला नगरपरिषद उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर, माजी सभापती सुनील मोरजकर ,
शिवसेना तालुकाप्रमुख बाळा दळवी, शिवसेना शहरप्रमुख अजित राऊळ,
आगार व्यवस्थापक नवज्योत गावडे, वाहतूक निरीक्षक अजित कदम, म्हापण जि. प. सदस्य यज्ञा साळगावकर, उभादांडा पं. स. सदस्य साक्षी नार्वेकर, नगरसेविका समिधा रेडकर व लीना म्हापणकर, उमेश नाईक, पंकज शिरसाट, कौशिक परब, हर्षद डेरे, शैलेश नार्वेकर, श्री.मालणकर, सत्यवान साटेलकर, मितेश परब,
चालक, वाहक, यांत्रिक कर्मचारी, तसेच अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
वेंगुर्ला एस. टी. आगार येथे प्राप्त 3 बसेसचे आ. दिपक केसरकर यांच्या हस्ते लोकार्पण
