Headlines

मालवण बंदर जेटी समुद्रकिनारी आढळला महिलेचा मृतदेह

मालवण : (प्रतिनिधी)

मालवण बंदर जेटी समुद्र किनारी आज रविवारी एका अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून आला. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच मालवण पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली.

पोलिसांनी सदर मृतदेह पाण्यातून किनाऱ्यावर आणल्यावर मृतदेहाचा पंचनामा करण्याची प्रक्रिया सुरु होती. मात्र मृत महिलेची अद्याप ओळख पटवता आलेली नाही. तसेच तिचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, हे स्पष्ट झालेले नाही. याप्रकरणी संबंधित यंत्रणांकडून पुढील कार्यवाही सुरू असून, महिलेची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, मृतदेह सापडल्याची माहिती दिल्यावर उशिराने पोलीस घटनास्थळी दाखल झाल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत होती.

You cannot copy content of this page