युवा नेते विशाल परब यांच्याकडून किडनीग्रस्त रुग्णाला आर्थिक मदत..
⚡सावंतवाडी ता.२०-: तळवडे येथील रहिवासी शामसुंदर मालवणकर हे किडनीच्या आजाराने त्रस्त असून, त्यांच्यावर मुंबई येथील जसलोक हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. त्यांच्या उपचारासाठी आर्थिक मदतीची गरज लक्षात घेऊन भाजपा युवा नेते विशाल परब यांच्या वतीने आर्थिक मदत करण्यात आली.
भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत ‘एक मदतीचा हात’ हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत गरजू रुग्णाला उपचारासाठी मदतीचा हात देण्यात आला.
यावेळी भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते दादा आगरवाडेकर, सुभाष कुंभार, तळवडे गावचे उपसरपंच गौरव मेस्त्री तसेच बाळा जाधव उपस्थित होते.
गरजू व्यक्तीच्या अडचणीच्या काळात मदतीसाठी पुढे येत सामाजिक बांधिलकी जपण्याच्या या उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत आहे.
