Headlines

रविंद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त दिव्यांग बांधवांना आधाराचा हात…

विशाल परब यांच्या पुढाकारातून आधाराच्या काठ्या व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप..

⚡सावंतवाडी ता.२०-: महाराष्ट्र भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी येथील भाजपा जनसंपर्क कार्यालयात महाराष्ट्र भाजपा युवा नेते विशाल परब यांच्या पुढाकाराने तसेच सावंतवाडी विधानसभा भाजपा यांच्या वतीने अंध, अपंग व दिव्यांग बांधव-भगिनींना आधाराच्या काठ्या आणि जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.

या उपक्रमामुळे दिव्यांग बांधवांच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधान पाहायला मिळाले. समाजातील गरजू घटकांच्या पाठीशी उभे राहणे हीच खरी सामाजिक बांधिलकी असल्याची भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली.
यावेळी बोलताना विशाल परब म्हणाले, “दिव्यांग बांधवांसाठी हे जनसंपर्क कार्यालय कायम खुले राहील. तुम्ही केव्हाही हाक द्या. तुमच्या अडचणीच्या काळात मी तुमच्यासाठी कायम उपलब्ध राहीन,” अशा शब्दांत त्यांनी दिव्यांग बांधवांना आधाराची ग्वाही दिली.
यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई, दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष अनिल शिंगाडे, केतन आजगांवकर, धिरेंद्र म्हापसेकर, सिद्धार्थ भांबूरे, गोविंद साटेलकर, बंटी जामदार आदी मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान, प्रसन्ना देसाई यांनी यावेळी एक आठवण सांगताना नमूद केले की, विशाल परब यांच्या सुविद्य पत्नी यांनीदेखील यावर्षी आपला वाढदिवस कुटुंबीयांसोबत साजरा न करता दिव्यांग बांधवांसोबत साजरा केला. यातून परब परिवाराचा दिव्यांग बांधवांप्रती असलेला जिव्हाळा, आपुलकी आणि सामाजिक बांधिलकी दिसून येते, असे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने दिव्यांग बांधव उपस्थित होते. गरजू घटकांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविणारे सामाजिक उपक्रम यापुढेही सातत्याने राबविण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.

You cannot copy content of this page