Headlines

कवयित्री मनीषा पाटील यांच्या ‘काहूर’ कवितासंग्रहाचा रविवारी कणकवलीत प्रकाशन सोहळा

कणकवली :
समाज साहित्य प्रतिष्ठान (सिंधुदुर्ग) आणि ‘मिळून साऱ्याजणी’ परिवार (कणकवली) यांच्या संयुक्त विद्यमाने कवयित्री मनीषा पाटील लिखित व ‘रावा प्रकाशन’ प्रकाशित ‘काहूर’ या दुसऱ्या कवितासंग्रहाचा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम रविवार, १६ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १०:३० वाजता कणकवली येथील वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या नाट्यगृहात पार पडणार आहे.

साहित्य अकादमी पुरस्कार विजेते कादंबरीकार कृष्णात खोत यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा रंगणार आहे. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ कादंबरीकार व कवयित्री उषा परब, नामवंत कवी व प्रसिद्ध स्तंभलेखक अजय कांडर आणि समाज साहित्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष मधुकर मातोंडकर उपस्थित राहणार आहेत.

तसेच कार्यक्रमास कणकवली शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा डॉ. धनश्री तायशेटे सावंत, चेअरमन डॉ. संदीप सावंत, शालेय समिती चेअरमन डॉ. एस. एन. तायशेटे, सचिव डी. एम. नलावडे, उपकार्याध्यक्ष एम. ए. काणेकर आणि एस. एम. ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य जी. एन. बोडके यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

समाज साहित्य प्रतिष्ठान सिंधुदुर्गच्या उपाध्यक्ष म्हणून कोकणच्या साहित्य चळवळीत निरंतर योगदान देणाऱ्या कवयित्री मनीषा पाटील यांच्या या काव्यसंग्रह प्रकाशनाला साहित्यरसिक, वाचक आणि कविताप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. (अधिक माहितीसाठी संपर्क: ९४२२८ १९४७४)

You cannot copy content of this page