Headlines

बांदा विकास संस्थेची कर्जवसुलीत शंभर टक्के कामगिरी

बांदा/प्रतिनिधी
बांदा विकास संस्थेने कर्जवसुलीत शंभर टक्के यश संपादन करून उल्लेखनीय कामगिरी केली आहे. संस्थेच्या या यशाबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने विशेष गौरव करण्यात आला.
संस्थेचे अध्यक्ष राजाराम उर्फ बाळू सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच कर्जदार सभासद आणि संचालक मंडळाच्या सहकार्यामुळे ही कामगिरी शक्य झाली. आर्थिक शिस्त, नियमित कर्जफेड आणि सभासदांच्या सक्रिय सहभागाच्या बळावर संस्थेने आदर्शवत कार्यपद्धती निर्माण केली आहे.
बांदा विकास संस्थेमार्फत शेतकरी सभासदांसाठी विविध उपक्रम सातत्याने राबविले जात असून, संस्थेच्या प्रगतीत सभासदांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला आहे. शंभर टक्के कर्जवसुलीचे उद्दिष्ट साध्य केल्याबद्दल संस्थेचा जिल्हा बँकेकडून गौरव करण्यात आला. यावेळी उपाध्यक्ष संजय चांदेकर, संचालक श्री. धुरी आणि संस्थेच्या सचिव सौ. मयुरी परब यांनी बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांच्या हस्ते सन्मान स्वीकारला.
या उल्लेखनीय यशाबद्दल बांदा विकास संस्थेचे पदाधिकारी, संचालक मंडळ, कर्मचारी आणि सभासदांचे सर्व स्तरांतून अभिनंदन करण्यात येत आहे.
फोटो:-
बांदा विकास सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांचा गौरव करताना जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी. सोबत इतर मान्यवर.

You cannot copy content of this page