Headlines

उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत पाट हायस्कूलचे उल्लेखनीय यश

कुडाळ : एस .के .पाटील शिक्षण प्रसारक मंडळ पाट पंचक्रोशी संचलित एस.एल.देसाई विद्यालयाच्या तीन विद्यार्थ्यांनी उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत (इयत्ता -सातवी)उल्लेखनीय असे यश संपादन करून प्रशालेची मान उंचावली आहे. यामध्ये भार्गव शंकर पेडणेकर यांने जिल्ह्यात द्वितीय क्रमांक पटकावून राष्ट्रीय ग्रामीण शिष्यवृत्ती प्राप्त केली आहे. भक्ती योगेश तेलीकोचरेकर व विघ्नेश अमर सावंत या विद्यार्थ्यांना ग्रामीण सर्वसाधारण शिष्यवृत्ती प्राप्त झाली. आहे. प्रशालेतील १६ विद्यार्थी उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाले आहेत.
या घवघवीत यशाबद्दल सर्व संस्था पदाधिकारी, प्रशालेचे मुख्याध्यापक सयाजी बोंदर ,पर्यवेक्षिका अंकिता मोडक, शिक्षक प्रतिनिधी संदीप साळसकर इतर सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पंचक्रोशीतील ग्रामस्थ यांनी या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. विद्यार्थ्यांना सिद्धी चव्हाण, तनुजा कोळंबकर, नंदिनी बुरुड, विनायक कांबळे या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.

You cannot copy content of this page