Headlines

वेंगुर्ला न.प. मार्फत हर घर तिरंगा अभियान अंतर्गत “तिरंगा रॅली “उत्साहात….

वेंगुर्ला
‘घरो घरी तिरंगा’ अभियानांतर्गत वेंगुर्ला नगरपरिषदमार्फत आज गुरुवारी ” तिरंगा रॅली ” स उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. वेंगुर्ला नगरपरिषद कार्यालय येथून नगराध्यक्ष दिलीप उर्फ राजन गिरप यांच्या हस्ते झेंडा दाखवून रॅलीचा शुभारंभ करण्यात आला. ही तिरंगा रॅली वेंगुर्ला नगरपरिषद येथून सुरू होऊन वेंगुर्ला बाजारपेठ, पोस्ट ऑफिस स्टॉप, पिराचा दर्गा स्टॉप, श्री रामेश्वर मंदिर स्टॉप, लौकीक हॉटेल ते पुन्हा वेंगुर्ला नगरपरिषद अशी संपन्न झाली. यावेळी देशभक्तीपर गीत ढोलपथक याद्वारे जय जवान -जय किसान, भारत माता की -जय, वंदे -मातरम आदी घोषणांनी वेंगुर्ला शहरात स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला चैतन्यमय व मंगलमय वातावरण निर्माण झाले होते. या रॅलीत नगराध्यक्ष दिलीप गिरप, उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर,मुख्याधिकारी हेमंत किरुळकर, प्रशासकीय अधिकारी अभिजित पाटील,
न. प. सभापती, नगरसेवक, नगरसेविका, बॅ. खर्डेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. धर्मराज गोस्वामी, प्रा. हेमंत गावडे, प्रा. गायकवाड, प्रा. जे. वाय. नाईक, मदर तेरेसा स्कूलचे विनायक ठाकूर, रा. कृ. पाटकर हायस्कूलचे मुख्याध्यापक सुशांत धुरी, सिंधुदुर्ग विद्यानिकेंतनचे पालयेकर, वेंगुर्ला हायस्कूलचे शिक्षक, जि.प. वेंगुर्ला शाळा नं.1 चे ज्ञानेश्वर हरमलकर, वेंगुर्ला शाळा नंबर 2 चे शिक्षक, वेंगुर्ला शाळा नं. 3 चे शिक्षक, तसेच या सर्व प्रशालांचे विद्यार्थी – विद्यार्थिनी, मच्छिमार नेते वसंत तांडेल, माजि उपनगराध्यक्ष अभि वेंगुर्लेकर, वृंदा गवंडळकर, अभि गिरप, स्नेहल शिंदे, पूर्वा मसुरकर तसेच नगरपरिषद अन्य अधिकारी, कर्मचारी बहुसंख्येने सहभागी झाले होते.

You cannot copy content of this page