Headlines

वाढदिवसाला उत्सव नव्हे, सेवाभावाचा संकल्प…

भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी-दोडामार्गात विविध सामाजिक उपक्रम; विशाल परब, ॲड. अनिल निरवडेकर यांचा पुढाकार..

⚡सावंतवाडी ता.१९-: भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात विविध सामाजिक व जनहितोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. भाजपा राज्य युवा नेते विशाल परब आणि सावंतवाडीचे उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांच्या पुढाकाराने तसेच भाजपा सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाच्या माध्यमातून सावंतवाडी व दोडामार्ग तालुक्यांत हे उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

वाढदिवस केवळ शुभेच्छा, केक किंवा सत्कारापुरता मर्यादित न राहता समाजातील गरजू घटकांपर्यंत सेवा पोहोचविण्याची संधी म्हणून साजरा व्हावा, या भावनेतून विविध उपक्रमांची आखणी करण्यात आली आहे. सामाजिक बांधिलकी जपत समाजातील विविध घटकांसाठी उपयुक्त उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
या उपक्रमांमध्ये सावंतवाडी व दोडामार्ग तालुक्यातील दिव्यांग बांधवांना विशेष प्राधान्य देण्यात येणार आहे. त्यांच्या गरजा व अडचणी जाणून घेत त्यांच्याशी संवाद साधत त्यांना आवश्यक मदत व सहकार्य करण्याच्या दृष्टीने विविध उपक्रम आयोजित केले जाणार आहेत.
याबाबत भाजपा राज्य युवा नेते विशाल परब म्हणाले, “वाढदिवस हा केवळ उत्सवाचा दिवस न राहता समाजासाठी काहीतरी करण्याची संधी असावी, या भावनेतून यंदा विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सावंतवाडी आणि दोडामार्ग या दोन्ही तालुक्यांमध्ये सेवाभावी उपक्रमांच्या माध्यमातून गरजू घटकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.”
रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या या उपक्रमांतून सेवा, समर्पण आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. दोन्ही तालुक्यांतील विविध ठिकाणी हे उपक्रम आयोजित केले जाणार असून, त्यामध्ये नागरिकांचाही सहभाग राहणार आहे.

You cannot copy content of this page