Headlines

मालवण तहसील कार्यालयात १ ऑक्टोबर रोजी महसूल लोकअदालत…

⚡मालवण ता.१९-:
मालवण तालुक्यातील महसूल न्यायालयांमध्ये प्रलंबित असलेल्या महसुली अर्धन्यायिक प्रकरणांचा जलदगतीने निपटारा करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ‘महसूल लोकअदालत’ अभियान आयोजित करण्यात आली आहे. या अभियानांतर्गत संबंधित नागरिक, शेतकरी बंधू-भगिनी, हितसंबंधितांना प्रलंबित प्रकरणांमध्ये तडजोडीने व गतीने निर्णय घेण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

तहसील कार्यालय, मालवण यांच्या न्यायालयात सुरू असलेल्या अधिकार अभिलेख / कुळ कायद्याशी संबंधित दावे तसेच मंडळ अधिकारीस्तरावरील सुनावणी सुरू असलेल्या तक्रारींचा या अभियानांतर्गत निपटारा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तडजोडीसाठी सुनावणीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून मालवण तहसीलदार यांच्या न्यायालयातील प्रकरणांसाठी १ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता येथील तहसील कार्यालय येथे सुनावणी होणार आहे. संबंधित कार्यक्षेत्रातील अपील / दावे व प्रकरणांचा तडजोडीने निपटारा करण्यासाठी ही लोकअदालत घेण्यात येणार आहे. ३० सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता मंडळ अधिकारी कार्यालये मालवण, आचरे, कुडाळ, श्रावण, पोईप, सुकळवाड, आचरा, कोळंब व मसुरे आदी ठिकाणी मंडळ अधिकारीस्तरावरील प्रलंबित तक्रारींच्या निपटाऱ्यासाठी सुनावणी आयोजित करण्यात आली आहे. संबंधितांनी उपस्थित राहण्याचे आवाहन मालवण तालुक्यातील सर्व संबंधित हितसंबंधित पक्षकार, अर्जदार व नागरिकांनी आपल्या प्रलंबित महसुली प्रकरणांच्या तडजोडीने निपटाऱ्यासाठी या लोकअदालतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन तहसीलदार गणेश लव्हे यांनी केले आहे.

You cannot copy content of this page