Headlines

अचानक लोडशेडिंग केल्याने विज वितरणाच्या अधिकाऱ्यास कर्मचाऱ्याला मारहाण…

पोलिस स्थानकात ९ जणांविरोधात गुन्हा दाखल; सावंतवाडी ता.२१-:शहरात काल रात्री कोणतीही पूर्वकल्पना न देता करण्यात आलेल्या लोडशेडिंग मुळे शहरातील नागरिकांचा राग अनावर होऊन विज वितरणचे उपकार्यकारी अभियंता आनंद गावडे व सुरक्षारक्षक चौरंग सावंत यांना मारहाण केल्या प्रकरणी शहरातील ९ जणांवर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा सगळा प्रकार काल रात्री उशिरा २:३० –…

Read More

मालवण येथे आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद…

महाराष्ट्र आरोग्य विभाग व ग्लोबल रक्तदाते यांच्या वतीने आयोजित करण्यात आले शिबिर मालवण (प्रतिनिधी) देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त केंद्र शासनाच्या निर्देशाप्रमाणे आरोग्य मेळाव्या अंतर्गत महाराष्ट्र आरोग्य विभाग व ग्लोबल रक्तदाते मालवण यांच्यावतीने मालवण येथील मामा वरेरकर नाट्यगृहात आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिरात ३४ रक्तदात्यांनी रक्तदान केले. या शिबिराचे उद्घाटन शतकवीर…

Read More

कळणे मार्गाने गोवा बनावट दारुच्या वाहतुकीचा सुळसुळाट…

वेळीच आळा घाला; अन्यथा पुराव्यानिशी झारीतील शुक्राचार्य उघड करू… दोडामार्ग ता.२१-:* दोडामार्ग कळणे मार्गे मोठ्या प्रमाणात राजरोसपणे गोवा बनावट दारुची वाहतूक सुरू असून ह्यावर तत्काळ आळा घालण्यात यावा अन्यथा ही गोवा बनावट दारूची वाहतूक कुठे आणि कोणाच्या माध्यमातून होते? ह्याचा झारीचा शुक्राचार्य कोण हे लवकरच पुराव्यानिशी उघड करू असा इशारा मनसेचे कळणे विभाग अध्यक्ष अभय…

Read More

माजी गृहराज्यमंत्री दीपक केसरकर झाले साईचरणी लीन

सावंतवाडी सालईवाडातील साईबाबांचे आमदार केसरकर यांनी घेतले दर्शन सावंतवाडी ता.२१-:* सालईवाडा येथील श्री. साई वात्सल्य, भवानी चौक यांच्या तर्फे दरवर्षी साईबाबांचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असून माजी गृहराज्यमंत्री आ. दीपक केसरकर साईचरणी लीन झाली‌. साईबाबांचे आशिर्वाद घेत धार्मिक कार्यक्रमांत त्यांनी सहभाग घेतला. यावेळी येथील जावेद शेख, देव्या सुर्याजी यांसह शेकडो साईभक्त उपस्थित…

Read More

लवकरच दिव्यांग वधू वर पालक मेळावा

नोंदणी करण्याचे नॅशनल असोसिएशन फॉर द बलाईड सोलापूर संस्थेचे आवाहन सावंतवाडी ता 21: नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड सोलापूर ह्या संस्थेच्या वतीने मोफत राज्यस्तरीय अंध अपंग मुकबधिर प्रवर्गातील दिव्यांग बांधवांच्या वधू वर पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे याची तारीख लवकरच प्रसिद्द करण्यात येणार असून जिल्ह्यातील जास्तीत जास्त अपंग बांधवांनी नोंदणी करण्याचे आवाहन संस्थेकडून करण्यात…

Read More

ज्ञानदीपतर्फे विविध उपक्रम राबविणार: वाय पी नाईक

सावंतवाडी ता.२१-:* येथील ज्ञानदीप शिक्षण विकास मंडळातर्फे दरवर्षी सलग सोळा वर्षे सामाजिक विधायक उपक्रम राबविरले जातात. मागील दोन वर्षे कोरोना काळात बंधनं आली होती.तरी आता शैक्षणिक, सामाजिक सांस्कृतिक उपक्रम हाती घेऊन यशस्वीपणे राबविण्याचा निर्धार या बैठकीत घेण्यात आला. अध्यक्षस्तानी‌ एस.आर. मांगले होते यापूर्वी क्रीडा विभाग ओरोस यांच्या सहकार्याने तीनशे वृक्षांची लागवड केली होती, येत्या पावसाळ्यात…

Read More

कोकणात ग्रीन रिफायनरी येत असेल तर “तो” मिळवणे आपला हक्क …

भंडारी समाज राष्ट्रीय अध्यक्ष नवीनचंद्र बांदिवडेकर यांचे प्रतिपादन… सावंतवाडी ता.२१-:* ग्रीन रिफायनरी सारखा प्रकल्प जर कोकणात येत असेल तर तो मिळवने आपला हा हक्क आहे. त्यामुळे सर्व जण आपण एकजुटीने लढून, आपला हक्क मिळवू या असे प्रतिपादन भंडारी समाज महासंघाच्या वतीने करण्यात आलेल्या ग्रीन रिफायनरी मेळाव्यादरम्यान राष्ट्रीय अध्यक्ष श्री नवीनचंद्र बांदिवडेकर यांनी केले ते उपस्थितांना…

Read More

रिक्षा चालक मालक संघटनेकडून राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या सत्कार…

३२ रिक्षा चालकांचे परमिट दिले नुतनीकरण करून… सावंतवाडी ता.२१-:* कोरोना कालखंडात जिल्ह्यातील रिक्षा चालकांचे परमिट नुतनीकरणाचे काम रखडून पडले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या माध्यमातून तो प्रश्न मार्गी लागला असून, जिल्ह्यातील ३२ रिक्षा चालकांचे परमिट नुतनीकरण करण्यात आले आहे. यानिमित्त सावंतवाडी तालुका रिक्षा चालक मालक संघटनेकडून राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या शाल श्रीफळ…

Read More

दशावतार कलाकार जगला तर दशावतारी कला जिवंत राहील : सहदेव धर्णे

कणकवली ता.२१-:* दशावतार कलाकार जगला तर दशावतारी कला जिवंत राहील यासाठी दशावतारी कलाकारांच्या आरोग्याविषयी आरोग्य शिबीर राबविण्यात येणार आहे.भविष्याचा विचार करून यापुढे दशावतारी कलाकारांना रोजगार मिळाला पाहिजे. त्यांची आर्थिक स्थिती चांगली झाली पाहिजे. यासाठी श्री सोमेश्वर कलामंच सामाजिक संस्था तर्फे प्रयत्न केला जाणार असल्याचे प्रतिपादन संस्थापक अध्यक्ष सहदेव धर्णे यांनी केले आहे. श्री सोमेश्वर कलामंच…

Read More

आदर्श शिक्षक आनंद तांबे यांची दर्पण प्रबोधि​​नी सिंधुदुर्गाच्या अध्यक्षपदी​ ​निवड

कणकवली ता.२१-:* मसुरे गावचे सुपुत्र आणि आदर्श शिक्षक आनंद मानाजी तांबे यांची निवड दर्पण प्रबोधिनी सिंधुदुर्गच्या​​ अध्यक्षपदी एकमताने नुकतीच करण्यात आली​.याबाबत मसुरे गाव, तसेच शिक्षक वृंद कणकवली तालुक्यातून विविध मान्यवरांनी अभिनंदन केले आहे. दर्पण प्रबोधिनी सिंधुदुर्गची नुतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.अध्यक्ष – आनंद मानाजी तांबे,उपाध्यक्ष – नरेंद्र वासुदेव तांबे व प्रज्ञा प्रकाश कदम तर सरचिटणीस…

Read More
You cannot copy content of this page