सावंतवाडी ता.२१-:* येथील ज्ञानदीप शिक्षण विकास मंडळातर्फे दरवर्षी सलग सोळा वर्षे सामाजिक विधायक उपक्रम राबविरले जातात. मागील दोन वर्षे कोरोना काळात बंधनं आली होती.तरी आता शैक्षणिक, सामाजिक सांस्कृतिक उपक्रम हाती घेऊन यशस्वीपणे राबविण्याचा निर्धार या बैठकीत घेण्यात आला. अध्यक्षस्तानी एस.आर. मांगले होते यापूर्वी क्रीडा विभाग ओरोस यांच्या सहकार्याने तीनशे वृक्षांची लागवड केली होती,
येत्या पावसाळ्यात पुन्हा वृक्षारोपण करण्यात येणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना कलागुणांना वाव देण्यासाठी चित्रकला स्पर्धा, निबंध लेखन, काव्य लेखन नेहमी प्रमाणे आयोजित केले जाईल. इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शन व सराव परीक्षेचे आयोजन करणे, ज्ञानदीप महिला आघाडीच्या वतीने जागतिक महिला दिन साजरा करुन समाजातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महिलांचा गौरव करणे, ग्रामीण भागातील महिलांच्या आरोग्याविषयक काळजी घेणे आवश्यक, यासाठी महिला डॉक्टर चे व्याख्यान आयोजित करणे.ज्ञानदीप कवी संमेलन, ज्ञानदीप वक्तृत्व स्पर्धा आयोजित करून युवापिढी ला प्रोत्साहन, प्रेरणा देणे.नवीन सक्रिय सभासद नोंदणी करण्यासाठी जिल्हा स्तरावर भेटीगाठी घेणे.जिल्हयातील आठही तालुक्यांत प्रतिनिधींची नेमणूक करुन शैक्षणिक उपक्रम राबविणे.
दहावी बारावी परीक्षेत तालुका व जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक प्राप्त गुणवंतांचा गौरव करणे. यापूर्वी मंडळाला शासनाचा आदर्श संस्था पुरस्कार मिळाला होता याचं भान ठेवून विधायक उपक्रमासाठी वेळ देऊन सक्रिय व्हावे अशी अपेक्षा या बैठकीत व्यक्त केली यावेळी वाय पी नाईक, जावेद शेख, निलेश पारकर (कणकवली)एस.आर. मांगले, विनायक गावस, आर.व्ही.नारकर(कासार्डे) सुनील नेवगी, प्रा.रुपेश पाटील,व्ही.टी.देवण(मळगाव) महेश कांडरकर (तळवडे) आदि मान्यवर उपस्थित होते
