Headlines

वेंगुर्ला तुळस गावच्या विकासासाठी सदैव प्रयत्नशील राहणार….

श्री. मनीष दळवी ; तुळस येथील विकासकामासाठी 10 लाख निधी मंजूर

वेंगुर्ला
यात्रा विकास योजनेअंतर्गत वेंगुर्ला तालुक्यातील तुळस श्री देव जैतीर मंदिर नजिक भक्तनिवास विस्तारीकरण व पेवर ब्लॉक बसविणे या विकास कामासाठी पालकमंत्री ना. नितेश राणे, आ. दिपक केसरकर व सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांच्या प्रयत्नातून 10 लाख रुपये निधी मंजूर झाला आहे. या विकास कामाचे भूमिपूजन श्री देव जैतीर देवस्थानचे मानकरी श्री. अनिल परब यांच्या हस्ते व सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. यावेळी वेंगुर्ला पं. स. सभापती शंकर घारे, तुळस जि.प. सदस्य सुजाता पडवळ, तुळस सरपंच रश्मी परब, माजी सभापती यशवंत उर्फ बाळू परब,
ग्रा. पं. सदस्य जयवंत तुळसकर, सचिन नाईक, चरित्रा परब, शिवसेना विभागप्रमुख संजय परब, तुळस माजी सरपंच आप्पा परब, रामचंद्र परब, तुळस श्री देव जैतीर सोसायटी सचिव सुशील परब, विनय गोरे, तंटामुक्ती समिती अध्यक्ष नाना राऊळ, दिवाकर परब, के. डी. परब, प्रसाद घारे, सुधीर भगत, बाळू मेस्त्री, पप्प्या परब, दिलीप परब, बाळा परब आदीसह ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते. दरम्यान तुळस गावातील श्री जैतिर मंदिर नजीक तसेच अन्य भागात विकास कामासाठी मंत्री ना. नितेश राणे यांच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहणार, असे आश्वासन जिल्हा बॅंक अध्यक्ष मनीष दळवी यांनी यावेळी बोलताना दिले.

You cannot copy content of this page