Headlines

वेंगुर्ला येथे उद्या विशाल परब यांच्यामार्फत दिव्यांग मेळावा

वेंगुर्ला
भाजपा युवा नेते विशाल प्रभाकर परब यांच्या वाढदिवसानिमित्त गुरुवार, दि. १५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४ वा. वेंगुर्ला येथील साई मंगल कार्यालयात दिव्यांग मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
भाजपा दिव्यांग विकास आघाडी, सिंधुदुर्ग, कोकण कला व शिक्षण विकास संस्था, सिंधुदुर्ग आणि राष्ट्रीय दृष्टिहीन संघ, महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
दिव्यांग बांधवांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे, त्यांना विविध शासकीय योजना व सुविधांची माहिती मिळवून देणे, त्यांच्या समस्या जाणून घेणे आणि त्यांच्या सक्षमीकरणासाठी आवश्यक सहकार्य उपलब्ध करून देणे हा अशा उपक्रमांमागील महत्त्वाचा उद्देश आहे. दिव्यांग व्यक्तींना सन्मानाने जगता यावे, त्यांना समाजात समान संधी मिळाव्यात आणि त्यांच्या अडचणींना योग्य व्यासपीठ मिळावे, यासाठी या मेळाव्याच्या माध्यमातून प्रयत्न केले जाणार आहेत. विशाल परब यांच्यामार्फत विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत असून दिव्यांग बांधवांसाठी आयोजित केलेला हा मेळावा सामाजिक बांधिलकी जपणारा उपक्रम ठरणार आहे. वाढदिवसाचा आनंद समाजातील गरजू घटकांसोबत साजरा करण्याच्या भूमिकेतून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. वेंगुर्ला तालुक्यातील दिव्यांग बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन आयोजकांमार्फत करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page