भंडारी समाज राष्ट्रीय अध्यक्ष नवीनचंद्र बांदिवडेकर यांचे प्रतिपादन…
सावंतवाडी ता.२१-:* ग्रीन रिफायनरी सारखा प्रकल्प जर कोकणात येत असेल तर तो मिळवने आपला हा हक्क आहे. त्यामुळे सर्व जण आपण एकजुटीने लढून, आपला हक्क मिळवू या असे प्रतिपादन भंडारी समाज महासंघाच्या वतीने करण्यात आलेल्या ग्रीन रिफायनरी मेळाव्यादरम्यान राष्ट्रीय अध्यक्ष श्री नवीनचंद्र बांदिवडेकर यांनी केले ते उपस्थितांना मार्गदर्शन करताना बोलत होते.
अखिल भारतीय भंडारी समाज महासंघाच्या वतीने आम्ही पुरस्कर्ते रत्नागिरी ग्रीन रिफायनरीचे या मेळाव्याचे येथील श्रीराम वाचन मंदिर येथे आयोजन करण्यात आले होते यावेळी श्री बांदिवडेकर बोलत होते ते पुढे म्हणाले की, रिफायनरी सारखा प्रकल्प आज जर कोकणात येत असेल तर उद्याच्या येणाऱ्या पिढीला एक रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकते त्यामुळे काहींकडून या प्रकल्पाला विरोध केला असला तरी आपण आपला हक्क मिळवून, सर्वांनी एकजूट लढून हा प्रकल्प होण्यासाठी प्रयत्न करुया असे आवाहनही त्यांनी यावेळी उपस्थितांना केले. यावेळी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर,दिलीप भालेकर,गुरू मठकर आदी उपस्थित होते.
