नवागत विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत; पालक व ग्रामस्थांची उपस्थिती..
⚡सावंतवाडी ता.१७-: येथील श्री कलेश्वर विद्या मंदिर वेत्ये या शाळेत शैक्षणिक वर्ष २०२६-२७ चा शाळा प्रवेशोत्सव उत्साहात पार पडला. नव्याने दाखल झालेल्या विद्यार्थ्यांचे शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य व ग्रामस्थांच्या उपस्थितीत स्वागत करण्यात आले.
यावेळी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा उत्साह वाढविण्यात आला. कार्यक्रमाला सरपंच, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सदस्य, पालक तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देत नवीन शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांनी नियमित शाळेत उपस्थित राहून अभ्यासाबरोबरच विविध उपक्रमांमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
शाळेच्या वतीने नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत करून आनंदी व उत्साही वातावरणात प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला.
