Headlines

लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावरवेंगुर्ला उभादांडा येथे गणपतीची प्रतिष्ठापना

वेंगुर्ला
संपूर्ण महाराष्ट्र राज्यात अनोख्या व वैशिष्ट्यपूर्ण परंपरेने प्रसिद्धीस पावलेल्या वेंगुर्ला तालुक्यातील उभादांडा येथील गणपती मंदिरात रविवारी (दि. 8 नोव्हेंबर ) सायंकाळी “लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर” गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली. दिवाळी दिवशी मंगलमय व भक्तिमय वातावरणात भाविकांच्या गर्दीत येथील प्रसिद्ध गणपतीचे पूजन करण्यात आले.
लक्ष्मीपूजन दिवशी पूजन झाल्यानंतर सुमारे चार महिने येथे गणपती स्थानापन्न असणार आहे. या कालावधीत जत्रोत्सव सह विविध धार्मिक कार्यक्रमासाठी स्थानिक तसेच घाटमाथ्यावरील भाविकांची गर्दी असते.
श्री गणपती मंदिर देवस्थान उभादांडा व ग्रामस्थ यांच्यावतीने सुयोग्य नियोजन करण्यात आले आहे. वेंगुर्ला गोव्याकडे जाणाऱ्या मार्गांनजिक
उभादांडा मुख्य रस्त्यानजिक हे मंदिर वसले असुन दरवर्षी भाविकांची संख्या वाढत आहे.

You cannot copy content of this page