⚡वेंगुर्ला ता.१७-: वेंगुर्ला तालुक्यातील आडेली आंबेडकरनगर येथील जलयुक्त शिवार मधून बांधण्यात येत असलेल्या सार्वजनिक विहिरीचे काम करण्यात येत असल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त करण्यात आले आहे. वेंगुर्ला तालुक्यातील आडेली आंबेडकरनगर येथे जलयुक्त शिवार अंतर्गत नवीन सार्वजनिक विहिरीचे काम करण्यात येत आहे. येथील नागरिकांना पाण्याची टंचाई निर्माण झाल्यावर जिल्हा प्रशासनासह जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती प्रितेश राऊळ यांनी तातडीने दखल घेत संबंधित ठेकेदारास हे काम तातडीने पूर्ण करण्याचे आदेश दिले होते. वेंगुर्ला पं. स.सभापती शंकर घारे, पंचायत समिती सदस्य नितीन मांजरेकर यांनीही हे काम मार्गी लागण्यासाठी शासमाकडे पाठपुरावा केला होता. त्यानंतर संबंधित ठेकेदारामार्फत तातडीने विहिरीचे
उर्वरित भरावाचे काम , बांधकाम तसेच विहिरीतील गाळ काढण्यात आला असून उर्वरित कामही लवकरात लवकर पूर्ण करण्यात येणार आहे. या कामाची नुकतीच वेंगुर्ला गटविकास अधिकारी दिनेश पाटकर, ग्रामीण पाणीपुरवठा उपअभियंता श्री. शिंदे यांनी भेट देऊन पाहणी केली असून लवकरात लवकर उर्वरित काम पूर्ण करण्याच्या संबंधित ठेकेदारास सूचना दिल्या आहेत.
वेंगुर्ला आडेली येथीलसार्वजनिक विहिरीचे काम प्रगतीपथावर…
