रिक्षा चालक मालक संघटनेकडून राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या सत्कार…

३२ रिक्षा चालकांचे परमिट दिले नुतनीकरण करून…

सावंतवाडी ता.२१-:* कोरोना कालखंडात जिल्ह्यातील रिक्षा चालकांचे परमिट नुतनीकरणाचे काम रखडून पडले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या माध्यमातून तो प्रश्न मार्गी लागला असून, जिल्ह्यातील ३२ रिक्षा चालकांचे परमिट नुतनीकरण करण्यात आले आहे. यानिमित्त सावंतवाडी तालुका रिक्षा चालक मालक संघटनेकडून राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष अमित सामंत, सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ अध्यक्षा अर्चना घारे-परब, राष्ट्रवादी नेते बाळ कनयाळकर, नझीर शेख, तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, शहराध्यक्ष देवेंद्र टेंमकर, बावतीस फर्नांडिस, याकुब शेख, कौस्तुभ नाईक, मयुरेश राऊळ आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना विधानसभा मतदारसंघ अध्यक्षा अर्चना घारे परब बोलताना म्हणाले की, राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचा रिक्षा चालक मालक संघटना कडून करण्यात आलेला सत्कार हा आनंददायी असून, रिक्षा चालकांचा पेन्शनचा प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही नक्कीच आमच्या परिने प्रयत्न करू असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला असून, रिक्षा चालकांच्या सगळ्याच समस्या सोडविण्यासाठी नेहमीच आमचे प्रयत्न असतील, ज्यावेळी आमची गरज भासेल त्यावेळी आम्हाला हाक द्या आम्ही तुमच्या हाकेला उत्तर देऊ असे आश्वासन देखील त्यांनी यावेळी दिले आहे. यावेळी रिक्षा युनियन अध्यक्ष धमेंद्र सावंत, उपाध्यक्ष महादेव बामणे, जिल्हा सेक्रेटरी सुधीर पराडकर, जयवंत टंगसाळी, मनोहर मसुरकर, आदेश नाईक, सदानंद धर्णे, राजन नवार, बाळा सुभेदार, बाळू वालावलकर, न्हानू राऊळ, यशवंत वेटे, दत्तप्रसाद शेटकर, नेपोलियन फर्नांडिस, अच्युत गावडे आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page