दशावतार कलाकार जगला तर दशावतारी कला जिवंत राहील : सहदेव धर्णे

कणकवली ता.२१-:* दशावतार कलाकार जगला तर दशावतारी कला जिवंत राहील यासाठी दशावतारी कलाकारांच्या आरोग्याविषयी आरोग्य शिबीर राबविण्यात येणार आहे.भविष्याचा विचार करून यापुढे दशावतारी कलाकारांना रोजगार मिळाला पाहिजे. त्यांची आर्थिक स्थिती चांगली झाली पाहिजे.

यासाठी श्री सोमेश्वर कलामंच सामाजिक संस्था तर्फे प्रयत्न केला जाणार असल्याचे प्रतिपादन संस्थापक अध्यक्ष सहदेव धर्णे यांनी केले आहे. श्री सोमेश्वर कलामंच सामाजिक संस्था आयोजित गराजलो रे गराजलो या नाटकाद्वारे जनजागृती करता करता प्रत्यक्षात १५ मुद्दे घेऊन निस्वार्थीपणे गराजलो रे गराजलो एक चळवळ सुरू केली आहे आणि या चळवळी अंतर्गत वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येत आहेत. गेल्या वर्षी दशावतारी कलाकारांचा आणि दशावतारी मंडळांचा जाहीर सत्कार करण्यात आला.कलाकार जगला तर कला जिवंत राहील.

यासाठी १) दशावतारी कलाकारांच्या आरोग्याविषयी आरोग्य शिबीर राबविण्यात येणार आहे. २) भविष्याचा विचार करून यापुढे दशावतारी कलाकारांना रोजगार मिळाला पाहिजे. त्यांची आर्थिक स्थिती चांगली झाली पाहिजे.यासाठी संकल्पना मांडण्यासाठी. ३) दशावतारी नाट्यप्रयोग सादर करताना उद्भवणाऱ्या समस्या उदा.माईक सिस्टीम समस्येमुळे त्यांच्या आवाजावर परिणाम होतो.यावर तोडगा काढण्यासाठी. लवकरच दशावतारी जाहीर मेळावा आयोजित करण्यात येणार आहे. सारं काही तुमच्यासाठी. तुमच्या उज्वल भविष्यासाठी. निस्वार्थीपणे कार्य करत राहणार असल्याचेही नाट्य प्रयोग दरम्यान सहदेव धर्णे यांनी सांगितले आहे.

You cannot copy content of this page