Headlines

संस्कारमय शिक्षण ही शाळेची खरी ओळख : अजयराज वराडकर…

⚡मालवण ता.१७-:
संस्कार मय शिक्षण ही शाळेची ओळख असून आज समाजात शाळा हीच खरी आधारस्तंभ बनली असून भविष्यातील समाज घडवण्याची ताकद शाळेत आहे.आजचे विद्यार्थी हे भविष्यातील आधारस्तंभ आहेत आणि म्हणून संस्कारमय शिक्षण हे शाळेची खरी ओळख असून यासाठी पालकांचे योगदान ही महत्वपूर्ण आहे. असे प्रतिपादन
कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अजयराज वराडकर यांनी काढले.

कट्टा येथील वराडकर हायस्कूल कट्टा च्या इयत्ता ५वी ते १२ वी च्या विद्यार्थ्यांच्या शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रमाच्या निमित्ताने ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर संस्थेचे सचिव श्री सुनील नाईक संस्थेचे खजिनदार श्री रविंद्र पावसकर सहसचिव श्री साबाजी गावडे, स्कूल कमिटी चेअरमन श्री सुधीर वराडकर संचालक सौ.स्वाती वराडकर, श्रीमती भारती वराडकर, डॉ. दादासाहेब वराडकर कला वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य ध्वजेंद्र मिराशी, श्री रविंद्र गावडे वराडकर हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. देवयानी गावडे, पर्यवेक्षक श्री महेश भाट आदी व इतर उपस्थित होते

या कार्यक्रमाच्या निमित्ताने इयत्ता पाचवी ते बारावीच्या नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले तसेच त्यांचे स्वागत पुष्पवृष्टीच्या माध्यमातून व ढोल ताशाच्या गजरात करण्यात आले. कार्यक्रमाचे खास आकर्षण पर्यावरण पूरक सेल्फी पॉइंट ठरला

यावेळी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पालक वृंद शिक्षण प्रेमी, हितचिंतक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You cannot copy content of this page