आदर्श शिक्षक आनंद तांबे यांची दर्पण प्रबोधि​​नी सिंधुदुर्गाच्या अध्यक्षपदी​ ​निवड

कणकवली ता.२१-:* मसुरे गावचे सुपुत्र आणि आदर्श शिक्षक आनंद मानाजी तांबे यांची निवड दर्पण प्रबोधिनी सिंधुदुर्गच्या​​ अध्यक्षपदी एकमताने नुकतीच करण्यात आली​.याबाबत मसुरे गाव, तसेच शिक्षक वृंद कणकवली तालुक्यातून विविध मान्यवरांनी अभिनंदन केले आहे. दर्पण प्रबोधिनी सिंधुदुर्गची नुतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.अध्यक्ष – आनंद मानाजी तांबे,उपाध्यक्ष – नरेंद्र वासुदेव तांबे व प्रज्ञा प्रकाश कदम तर सरचिटणीस -सुभाष बाळकृष्ण कदम यांची निवड करण्यात आली आहे.

संस्थेच्या जयभीम महोत्सवात नव्या कार्यकारिणीची निवड करण्यात आली यावेळी सरचिटणीस पदी सुभाष बाळकृष्ण कदम सहसचिव – संदेश अनिल कदम, खजिनदार -विशाल गोपाळ कासले कार्यकारिणी सदस्य – राजेश पुरूषोत्तम कदम, सिद्धार्थ गोपाळ तांबे, सुधीर भास्कर तांबे,सिद्धार्थ नारायण तांबे,श्रीधर शांताराम तांबे,सुनील भास्कर तांबे,किशोर देऊ कदम,महेंद्र यशवंत कदम विशाल धोंडी हडकर,अनिल भास्कर तांबे प्रकाश गणपत कदम,संजना संतोष तांबे नितीन शांताराम कदम,दिलीप दत्ताराम कदम पूनम विठ्ठल कदम, या पदग्रहण सोहळ्यात सल्लागार सुरेश कदम, प्रा. डॉ. राजेंद्र मुंबरकर,प्रा.डाॅ.सोमनाथ कदम, नितीन कदम, डॉ. व्हि. जी. कदम, डॉ. अशोक कदम, संतोष तांबे,संगम कदम ,महिला फ्रंट अध्यक्षा स्नेहल तांबे यांनी उपस्थित राहून नुतन कार्यकारिणीच्या पुढील सामाजिक वाटचालीला सदिच्छा दिल्या. आणि संस्थेच्या स्तुत्य उपक्रमाबाबत गौरवोद्गार काढले.

फुले आंबेडकरी विचारधारेचे कृतीशील आणि विचारशील क्रांतिचक्र असलेली दर्पण प्रबोधिनी सिंधुदुर्ग ही सामाजिक संस्था गेली अनेक वर्षे समाज प्रबोधनाच्या चळवळीत कार्य करत आहे. संस्थेचे संस्थापक उत्तम पवार यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन ही संस्था विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक उपक्रमांच्या माध्यमातून सम्यक परिवर्तनाच्या दिशेने वाटचाल करत आहे. अलिकडच्या पाच वर्षांत दर्पणचे अध्यक्ष राजेश कदम यांनी आपल्या सहकार्‍यांच्या सहयोगातून या संस्थेच्या कार्याची ओळख राज्यस्तरावर पोहोचवली .कोविडच्या काळातही वैविध्यपूर्ण ​ऑनलाईन उपक्रम राबवून समाजातील सर्व घटकांना सामाजिक प्रबोधनाची प्रेरणा दिली.

You cannot copy content of this page