⚡सावंतवाडी, ता. १४-: आमदार निलेश राणे यांनी बुधवारी रात्री सावंतवाडी शहरातील बाजारपेठ येथील नवरात्र उत्सव मित्रमंडळाच्या दुर्गामातेचे दर्शन घेतले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष सत्यवान बांदेकर यांनी त्यांचा यथोचित सत्कार केला.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, उपजिल्हाप्रमुख झेवियर फर्नांडिस, युवा सेना तालुकाप्रमुख क्लेटस फर्नांडिस, नगरसेवक देव्या सुयाजी, बंटी पुरोहित, माजी नगरसेवक गुरुदास मठकर, संतोष मुंज, सकल मराठा समाज जिल्हाध्यक्ष तथा पत्रकार सिताराम गावडे, परीक्षित मांजरेकर, अर्चित पोकेळे यांच्यासह स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान, आमदार निलेश राणे यांनी सावंतवाडी जिमखाना तसेच भटवाडी येथील दुर्गामातेचेही दर्शन घेत आशीर्वाद घेतले.”
