लवकरच दिव्यांग वधू वर पालक मेळावा

नोंदणी करण्याचे नॅशनल असोसिएशन फॉर द बलाईड सोलापूर संस्थेचे आवाहन

सावंतवाडी ता 21: नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड सोलापूर ह्या संस्थेच्या वतीने मोफत राज्यस्तरीय अंध अपंग मुकबधिर प्रवर्गातील दिव्यांग बांधवांच्या वधू वर पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे याची तारीख लवकरच प्रसिद्द करण्यात येणार असून जिल्ह्यातील जास्तीत जास्त अपंग बांधवांनी नोंदणी करण्याचे आवाहन संस्थेकडून करण्यात आले आहे.

या मेळाव्याचे फॉर्म संस्थेच्या https://forms.gle/2RhBxnwQqpbNHfyg7 लिंकवर उपलब्ध असून विवाहोछ्युकांनी आपली संपूर्ण माहिती ऑनलाइन पद्धतीने भरावी अथवा ऑफलाइन पद्धतीने भरून संस्थेचे कार्यालय नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड जिल्हा शाखा सोलापूर, रत्नदीप हाऊसिंग सोसायटी जवळ विकास नगर मागे, सिविल लाइन्स सोलापूर या पत्त्यावर 30 एप्रिल पर्यन्त पाठवावी या पालक परिचय मेळाव्याचे फॉर्म नब सिंधुदुर्गच्या सावंतवाडी येथील कार्यालयात उपलब्ध आहेत वधू वर पालक परिचय मेळाव्याची तारीख लवकरात लवकर प्रसिद्ध करण्यात येणार असून जिल्ह्यातील अपंग बांधवांनी या वधू वर पालक परिचय मेळाव्याचा लाभ घेण्यासाठी दिलेल्या लिंक वर नोंदणी करावी असे आवाहन नब सिंधुदुर्ग चें अध्यक्ष अनंत उचगावकर व सचिव सोमनाथ जिगजीन्नी यांनी केले आहे

You cannot copy content of this page