सावंतवाडी सालईवाडातील साईबाबांचे आमदार केसरकर यांनी घेतले दर्शन
सावंतवाडी ता.२१-:* सालईवाडा येथील श्री. साई वात्सल्य, भवानी चौक यांच्या तर्फे दरवर्षी साईबाबांचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असून माजी गृहराज्यमंत्री आ. दीपक केसरकर साईचरणी लीन झाली. साईबाबांचे आशिर्वाद घेत धार्मिक कार्यक्रमांत त्यांनी सहभाग घेतला.
यावेळी येथील जावेद शेख, देव्या सुर्याजी यांसह शेकडो साईभक्त उपस्थित होते. पहाटे साईंची पूजा, अभिषेक व आरती पार पडली. दुपारी महाप्रसाद देण्यात आला. तर संध्याकाळी पाच वाजता भजनाचा कार्यक्रम, रात्री दशावतार नाट्य प्रयोग ‘प्रतिशोध’ होणार आहे.
