वेळीच आळा घाला; अन्यथा पुराव्यानिशी झारीतील शुक्राचार्य उघड करू…
दोडामार्ग ता.२१-:* दोडामार्ग कळणे मार्गे मोठ्या प्रमाणात राजरोसपणे गोवा बनावट दारुची वाहतूक सुरू असून ह्यावर तत्काळ आळा घालण्यात यावा अन्यथा ही गोवा बनावट दारूची वाहतूक कुठे आणि कोणाच्या माध्यमातून होते? ह्याचा झारीचा शुक्राचार्य कोण हे लवकरच पुराव्यानिशी उघड करू असा इशारा मनसेचे कळणे विभाग अध्यक्ष अभय पांडुरंग देसाई यांनी प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून केली आहे
