महाराष्ट्र आरोग्य विभाग व ग्लोबल रक्तदाते यांच्या वतीने आयोजित करण्यात आले शिबिर
मालवण (प्रतिनिधी) देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त केंद्र शासनाच्या निर्देशाप्रमाणे आरोग्य मेळाव्या अंतर्गत महाराष्ट्र आरोग्य विभाग व ग्लोबल रक्तदाते मालवण यांच्यावतीने मालवण येथील मामा वरेरकर नाट्यगृहात आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिरात ३४ रक्तदात्यांनी रक्तदान केले. या शिबिराचे उद्घाटन शतकवीर रक्तदाते गणेश आमडोसकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. बालाजी पाटील यांच्या हस्ते आमडोसकर यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. या शिबिरात ३४ रक्तदात्यांनी रक्तदान करत सहकार्य केले.
यावेळी एका पेक्षा एक नृत्यस्पर्धेचा विजेता सॅड्रीक डीसोजा हा उपस्थित होता यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख व जि.प. सदस्य हरी खोबरेकर यांनीही रक्तदान केले. या शिबिरासाठी जिल्हा रक्तपेढीचे डॉ. अमित आवळे, प्रांजल परब, सुनील वानोळे, नितीन गावकर, सुरेश डोंगरे, नंदकुमार आडकर यांचे सहकार्य लाभले. यावेळी डॉ.बालाजी पाटील, आरोग्य सेवक राजेश पारधी, उद्योजक राजनजी परुळेकर, नितीन मांजरेकर , जि.प. सदस्य हरी खोबरेकर, ग्लोबल रक्तदाते संघटक अमेय देसाई , विकास पांचाळ, राजा शंकरदास, सौ.नेहा कोळंबकर, सौ. राधा केरकर , सूर्यकांत कदम, मुकेश बावकर, महेश जावकर आदी व इतर उपस्थित होते.
