अचानक लोडशेडिंग केल्याने विज वितरणाच्या अधिकाऱ्यास कर्मचाऱ्याला मारहाण…

पोलिस स्थानकात ९ जणांविरोधात गुन्हा दाखल;

सावंतवाडी ता.२१-:शहरात काल रात्री कोणतीही पूर्वकल्पना न देता करण्यात आलेल्या लोडशेडिंग मुळे शहरातील नागरिकांचा राग अनावर होऊन विज वितरणचे उपकार्यकारी अभियंता आनंद गावडे व सुरक्षारक्षक चौरंग सावंत यांना मारहाण केल्या प्रकरणी शहरातील ९ जणांवर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा सगळा प्रकार काल रात्री उशिरा २:३० – ३:०० च्या सुमारास कोलगाव येथील उपकेंद्रात घडला आहे. याबाबत आनंद गावडे यांनी सरकारी कामात अडथळा निर्माण केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

You cannot copy content of this page