जिल्ह्यात आलेल्या आ मिटकरी यांच्या विरोधात दिल्या घोषणा
सिंधुदुर्गनगरी ता २१ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनी ब्राम्हण समाज, व कन्यादान विधी संदर्भात केलेल्या चुकीच्या (आक्षेपार्ह) वक्तव्याचा सिंधुदुर्ग जिल्हा ब्राम्हण समाजाच्यावतीने निषेध व्यक्त करण्यात आला. तसेच आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अमोल मिटकरी “हाय हाय” च्या घोषणा देत ब्राम्हण समाजाच्यावतीने तीव्र संताप व्यक्त करण्यात आला.
सांगली येथे झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यात आमदार अमोल मिटकरी यांनी ब्राम्हण समाज आणि कन्यादान विधी संदर्भात चुकीचे वक्तव्य केले होते. यामुळे समस्त ब्राम्हण समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. लोकप्रतिनिधीना हे वक्तव्य शोभणारे नाही. त्यामुळे आमदार मिटकरी यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी आज जिल्ह्यातील ब्राम्हण समाज बांधव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकत्र येत आमदार अमोल मिटकरी यानी केलेल्या वक्तव्याचा निषेध केला. तसेच आमदार मिटकरी हाय हाय अशा घोषणा ही दिल्या. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा ब्राम्हण समाजाचे जयेश चींचळकर, ॲड लक्ष्मण बाकरे, विवेक गोखले, मंजुनाथ फडके, आशुतोष मुंडले, हर्षद कशाळीकर, सदाशिव सादले आदी उपस्थित होते. * भेट न देता पळ काढली.
आमदार अमोल मिटकरी हे सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आले आहेत. त्यानी केलेल्या वक्तव्यासंदर्भात सिंधुदुर्ग जिल्हा ब्राम्हण समाजाच्यावतीने निवेदन देण्यासाठी त्यांची आज भेट घेण्यासाठी वेळ मागितली होती मात्र आ. मीटकरी हे ब्राम्हण समाजाला न भेटता त्यांनी आड मार्गाने पळ काढली. असल्याची माहिती ब्राम्हण समाजाचे जयेश चींचळकर यांनी दिली.
