⚡बांदा ता.२४-: क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद, सिंधुदुर्ग आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय जुदो स्पर्धेत दिव्य ज्योती प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी भरघोस यश संपादन केले. सदर स्पर्धा ओरोस, क्रीडा संकुल येथे संपन्न झाली.
70 ते 75 किलो वजनी गटात अवनीश कळंगुटकर यांने प्रथम क्रमांक पटकावला तर 60 ते 66 किलो वजनी गटात वरूण देसाई याने प्रथम क्रमांक पटकावला. ४० किलो खाली वजनी गटात पार्थ पटेकर तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरला.
यशस्वी विद्यार्थ्यांना प्रशालेचे क्रीडा शिक्षक संदीप देसाई यांचे मार्गदर्शन लाभले. अवनीश कळंगुटकर व वरुण देसाई यांची विभाग स्तरावर खेळण्यासाठी निवड झाली आहे. प्रशालेचे मुख्याध्यापक फादर रॉबिन, व्यवस्थापक फादर लिजो, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी पालक यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.
फोटो:-
पासपोर्ट 2
जिल्हास्तरीय जुदो स्पर्धेत दिव्य ज्योती प्रशालेचे घवघवीत यश…
