⚡बांदा ता.२४-: बांदा येथील श्री विठ्ठल मंदिरात सात दिवस सुरू असलेल्या हरिनाम वीणा सप्ताहाची शुक्रवारी दुपारी ठिक 12 वाजता सांगता झाली. शनिवार दि. 25 जुलै रोजी मंदिरात आषाढी एकादशीचा सोहळा होणार आहे.
शनिवारी पहाटे 5 वाजता काकड आरती होईल. त्यानंतर दर्शनास सुरूवात होईल. या सोहळ्यानिमित्त विविध दिंड्यांचे आगमन होईल. सायंकाळी 7 वा. सायं आरती तर रात्री 9 वाजता पालखीचा सोहळा होईल. याचा भाविकांनी लाभ घेण्याचे आवाहन श्री विठ्ठल मंदिर, बांदा तर्फे करण्यात आले आहे.
फोटो – (बांदा श्री विठ्ठल मंदिरात वीणा सप्ताह सांगता सोहळ्यानंतर गाऱ्हाण्यास उपस्थित ग्रामस्थ व भाविक)
