मालवण दि प्रतिनिधी :
मालवण नगरपरिषद माध्यमातून शहरातील मेढा भागात हॉटेल आना नाना ते मुरलीधर मंदिर ते रघुनाथ देसाई हायस्कुल कॉर्नर पर्यत गटार बांधकाम सुरु आहे. यांसह गटार बांधकामांची पाहाणी बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर यांनी करीत दर्जेदार कामालाच सर्वोच्च प्राधान्य असले पाहिजे अश्या सूचना त्यांनी केल्या.
आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून मालवण शहाराच्या सर्वांगीण आणि गतिमान विकासाला प्राधान्य दिले जात असताना मोठया प्रमाणात विकासनिधी प्राप्त होतं आहे. अनेक विकासकामे प्रगतीपथावर आहेत. विकासकामे होतं असताना ती दर्जेदार आणि वेळेत व्हावीत याला सर्वोच्च प्राधान्य राहणार आहे. आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वात मालवण शहाराच्या सर्वांगीण विकासासाठी लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही कटीबद्ध आहोत. असे बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर यांनी यावेळी सांगितले.
फोटो :
मालवण नगरपालिकेचे बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर यांनी मेढा येथे सुरु असलेल्या गटार बांधकामाची पाहाणी केली.
