Headlines

श्री बांदेश्वर सेवा -सुविधा केंद्राच्या वतीने बांदा शहरात उद्या भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन…

*⚡बांदा ता.३०-:* येथील श्री बांदेश्वर सेवा -सुविधा केंद्राच्या वतीने बांदा शहरात १ मे रोजी भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये तात्काळ नेमणूक पत्र देण्यात येणार आहे. गोव्यातील नामांकित कंपन्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील युवक व युवतीना रोजगार मिळवून देण्यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. दहावी, बारावी, आयटीआय, पदवी धारक मुले व मुली यांनी सकाळी…

Read More

मालवणात वारकरी कीर्तन महोत्सवाचा वारकरी दिंडीने शुभारंभ

*⚡मालवण ता.३०-:* बॅ. नाथ पै यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त बॅ. नाथ पै सेवांगण, मालवण आणि वार्षिक रिंगण यांच्यावतीने वारकरी कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून त्याचा शुभारंभ आज मालवण शहरातून वारकरी दिंडी काढून करण्यात आला. पारंपारिक वेश परिधान करत , टाळ मृदुन्ग आणि चिपळ्यांचा गजर करत, अभंगांचे गायन करीत काढलेली ही वारकरी दिंडी लक्षवेधी ठरली. बॅ….

Read More

प्रमुख ४ संघटनांमधील नगरपालिका कर्मचारी २ मे पासून बेमुदत संपावर

मालवण दि प्रतिनिधी राज्य शासनाने वेळोवेळी नगरपरिषद, नगरपालिका कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांबाबत दुर्लक्ष केल्याने अनेक वर्षांपासून कार्यरत असलेल्या संघटना महाराष्ट्र राज्य नगरपरिषद कर्मचारी समन्वय समिती , नगरपरिषद, महानगरपालिका कर्मचारी महासंघ (भारतीय मजदूर संघ), महाराष्ट्र राज्य नगरपरिषद, नगरपंचायत कर्मचारी / संवर्ग कर्मचारी संघटना, राज्य म्युन्सिपल एम्प्लॉईज युनियन या महाराष्ट्रातील सर्व मुख्य चार संघटनांचे नगरपरिषद कर्मचारी २ मे…

Read More

महागाई विरोधात भारतीय मजदुर संघाच्या वतीने ९ मे ला राज्यभर निदर्शने धरणा आंदोलन…

मालवण ता.३०-:* महाराष्ट्र राज्यात जीवनावश्यक वस्तूंच्या कींमती प्रचंड प्रमाणात वाढल्या आहेत. महागाईने गोरगरिब जनता असंघटित कामगार मेटाकुटीला आले आहेत. त्यावर राज्य व केंद्र सरकारने त्वरित अंकुश लावून महागाई कमी करावी या मागणीसाठी भारतीय मजदूर संघाच्या वतीने दिनांक ९ मे २०२२ रोजी राज्यभर निदर्शने धरणा आंदोलन करण्यात येणार असून या आंदोलनात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कामगारांनी मोठ्या संख्येने…

Read More

जिल्हा नियोजनमधून पर्यटन महोत्सव

जिल्ह्यात चौथी कोरोनाची लाट नाही पालकमंत्री उदय सामंत ओरोस ता.३०-:जिल्ह्यात पर्यटनाला अधिक चालना देण्यासाठी जिल्हा नियोजन निधीतून यावर्षी कुणकेश्वर, मालवण, वेंगुर्ले व सावंतवाडी येथे पर्यटन महोत्सव आयोजित करण्यात येणार आहेत. तर पुढील वर्षांपासून जिल्हा स्तरावर मोठ्या स्वरूपाचा ‘सिंधू महोत्सव’ आयोजित करण्याचा निर्णय आज झालेल्या सभेत घेण्यात आला असल्याची माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली. तसेच…

Read More

प्राथमिक शिक्षक समिती मालवण तालुकाध्यक्ष पदी सुयोग धामापूरकर यांची निवड

मालवण ता.३०-:* महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती तालुका शाखा मालवणचे त्रैवार्षिक अधिवेशनात समितीची मालवण तालुका कार्यकारिणी जाहिर करण्यात आली. यामध्ये तालुका अध्यक्ष पदी सुयोग धामापूरकर यांची निवड करण्यात आली. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती तालुका शाखा मालवणचे त्रैवार्षिक अधिवेशन नुकतेच पोईप- विरण येथील इंदिरादेवी वर्दम हायस्कुल येथे संघटनेचे जिल्हाध्यक्ष नितीन कदम यांच्या अध्यक्षतेखाली व उद्घाटक…

Read More

कामगारांमधील एकी हेच संघटनेचे बळ असते – अशोक सावंत

मालवण ता.३०-:* संघटित किंवा असंघटित कामगारांच्या संघटना मजबूत करण्यासाठी कामगारांनी एक मताने आणि एक दिलाने संघटनेचे काम करायला हवे. कामगारांमधील एकी हेच संघटनेचे बळ असते आणि यामुळेच आपले न्याय हक्क आपण मिळवू शकतो, असे प्रतिपादन कामगार नेते तथा भाजप जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत यांनी केले. भाजपा चित्रपट कामगार आघाडीचे कामगार नेते तथा पालक संजय केणेकर,…

Read More

आंबेगाव उपसरपंच शिवाजी परब यांचे ते उपोषण तात्पुरते स्थगित…

*सावंतवाडी ता ३०-:* आंबेगाव मधलीवाडी सटवाडी ते माडखोल हद्द रस्त्याचे डांबरीकरण 2 मे पासून सुरू करण्यात येणार असल्याचे लेखी आश्वासन मुख्यमंत्री ग्रामसडक योजना कार्यकारी अभियंता यांनी दिल्याने शिवाजी उर्फ संजू परब यांनी 1 मे रोजी पुकारले उपोषण आश्वासनानंतर तात्पुरते स्थगित करण्यात आले. आहे.. लेखी आश्वासनाचे पत्र कार्यकारी अभियंता यांनी आंबेगाव येथे येऊन दिले यावेळी भाजप…

Read More

बांधकाम कामगारांनी अस्तित्वात नसलेल्या योजनांच्या आमिषाला बाळी पडू नये

बांधकाम कामगार महासंघ जिल्हाध्यक्ष भगवान साटम यांचे आवाहन कणकवली ता.३०-:* नोंदीत बांधकाम कामगारांना गृहउपयोगी भांड्यांचा संच मिळणार असल्याचे आमिष दाखवून काही एजंट व स्वयंघोषित कामगार संघटना कामगारांची आर्थिक लुबाडणूक करत असून बांधकाम कामगारांनी अश्या कोणत्याही खोट्या अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन बांधकाम कामगार महासंघ जिल्हा अध्यक्ष भगवान साटम यांनी केले आहे. आज नोंदीत बांधकाम…

Read More

“त्या” सात संशयितांना सशर्त जामीन मंजूर…

वीज कर्मचारी मारहाण प्रकरण सावंतवाडी ता.२३-:* लोडशेडिंगच्या वादातून विज कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या ७ संशयिताना आज येथील न्यायालयात हजर केले असता त्यांना सशर्त जामीन मंजूर करण्यात आला .याकामी अँड.अनिल निरवडेकर यांनी काम पाहिले.

Read More
You cannot copy content of this page