बांधकाम कामगारांनी अस्तित्वात नसलेल्या योजनांच्या आमिषाला बाळी पडू नये

बांधकाम कामगार महासंघ जिल्हाध्यक्ष भगवान साटम यांचे आवाहन

कणकवली ता.३०-:* नोंदीत बांधकाम कामगारांना गृहउपयोगी भांड्यांचा संच मिळणार असल्याचे आमिष दाखवून काही एजंट व स्वयंघोषित कामगार संघटना कामगारांची आर्थिक लुबाडणूक करत असून बांधकाम कामगारांनी अश्या कोणत्याही खोट्या अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन बांधकाम कामगार महासंघ जिल्हा अध्यक्ष भगवान साटम यांनी केले आहे. आज नोंदीत बांधकाम कामगार २०१९ पासूनच्या आर्थिक लाभांपासून वंचित असताना आणि त्यातच बांधकाम मंडळ यापूर्वी जाहीर केलेल्या आर्थिक लाभ योजना, मुदतीची मर्यादा घालून बंद करत आहे.

तर दुसऱ्या बाजूने वस्तूरुपी लाभांना मुदत वाढ देऊन वास्तुरूपी लाभ जलद गतीने होण्यासाठी मंडळाचे अधिकारी प्रयत्न करीत असून, कामगारांना थेट आर्थिक लाभ बँक खाती जमा करण्यास टाळाटाळ करत आहेत.एका बाजूने ३१ मार्च २०२२ रोजी पर्यंत नोंदीत असलेल्या कामगारांना देण्यात येणारा सुरक्षा संच(किट) बोगस व तकलादू असतानाही असे साहित्य कामगारांच्या माथी मारले जात आहे.याबाबत भारतीय मजदूर संघाने तक्रार करूनही संबधित कंत्राटदार कंपनीवर कोणतीच कारवाई केल्याचे दिसून येत नाही. असे प्रकार घडत असताना काही एजंट व स्वयंघोषित कामगार संघटना संसार सेट या स्वयंघोषित योजनेमार्फत गृहउपयोगी भांड्यांचा सेट मिळणार असल्याचे कामगारांना सांगून कामगारांकडून आर्थिक लुबाडणूक करत असल्याचे समजत आहे.भारतीय मजदूर संघाने नोंदीत बांधकाम कामगारांना कोणताही लाभ वास्तुरूपात देण्यास यापूर्वीच विरोध केला आहे. कामगारांना कोणताही लाभ आर्थिक स्वरूपात थेट कामगारांच्या बँक खाती जमा करण्याच्या मागणीवर भारतीय मजदूर संघ ठाम आहे.कामगारांनी कोणत्याही फसाव्या योजनांना बळी न पडण्याचे आवाहन श्री .साटम यांनी केले आहे.

You cannot copy content of this page