Headlines

काँग्रेस सावंतवाडी तालुका काँग्रेसतर्फे इंदिरा गांधी पुण्यतिथी व सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती साजरी..

⚡सावंतवाडी, ता. ३१-: सावंतवाडी तालुका राष्ट्रीय काँग्रेस कमिटीच्या वतीने माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी तसेच भारताचे पहिले गृहमंत्री पोलादी पुरुष स्व. सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली.

यावेळी दोन्ही नेत्यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून पुष्पांजली वाहण्यात आली. यावेळी काँग्रेसच्या जडणघडणीत तसेच भारताच्या विकासात स्व. इंदिरा गांधी यांचे मोठे योगदान असल्याचे उपस्थितांनी सांगितले. तसेच देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात सरदार वल्लभभाई पटेल यांनी दिलेले योगदान आणि देशाच्या एकात्मतेसाठी त्यांनी केलेले कार्य याचे स्मरण करण्यात आले.

काँग्रेस पक्षाने स्वातंत्र्य चळवळीत मोठा त्याग केला असून, अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी अन्याय-अत्याचार सहन करत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपले जीवन समर्पित केले, असे यावेळी सांगण्यात आले. स्वातंत्र्य चळवळीतून मिळविलेले स्वातंत्र्य आज प्रशासकीय यंत्रणेच्या विविध प्रश्नांमध्ये अडकले असल्याची खंतही व्यक्त करण्यात आली. यावेळी काँग्रेसचे प्रांतिक सदस्य अॅड. दिलीप नार्वेकर, तालुकाध्यक्ष अभय मालवणकर, राजेंद्र मसुरकर, रवींद्र मापसेकर, सुनील पेडणेकर आदींनी विचार व्यक्त केले. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात काँग्रेसने सुरुवातीपासूनच विकासाची भूमिका बजावली असून, काँग्रेसच्या माध्यमातून स्व. शिवरामराजे भोसले, स्व. प्रतापराव भोसले आणि माजी राज्यमंत्री प्रविणभाई भोसले यांनी आमदार म्हणून मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले, असे यावेळी नमूद करण्यात आले. दरम्यान, कोल्हापूरचे माजी आमदार सतेज ऊर्फ बंटी पाटील यांच्या नेतृत्वाखाली गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत काँग्रेसला निर्विवाद बहुमत मिळाल्याबद्दल त्यांच्या अभिनंदनाचा ठराव यावेळी सर्वानुमते मंजूर करण्यात आला.

कार्यक्रमाला महिला जिल्हा काँग्रेस अध्यक्षा साक्षी वंजारी, शहराध्यक्ष सुमेधा सावंत, अॅड. राघवेंद्र नार्वेकर, कौस्तुभ पेडणेकर, सुधीर मल्हार, विजय ओठवणेकर, आनंद आयरे, प्रदीप चौगुले, संतोष तावडे, पीटर फर्नांडिस, अरुण भिसे, विष्णू पेडणेकर, विनायक सावंत, बाळा संजय लाड, सुभाष नाईक, संतोष पेडणेकर, प्रसाद ढवळे, रामू गवळी, संतोष जोईल, आफताब हेरेकर यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.”

You cannot copy content of this page