महागाई विरोधात भारतीय मजदुर संघाच्या वतीने ९ मे ला राज्यभर निदर्शने धरणा आंदोलन…

मालवण ता.३०-:* महाराष्ट्र राज्यात जीवनावश्यक वस्तूंच्या कींमती प्रचंड प्रमाणात वाढल्या आहेत. महागाईने गोरगरिब जनता असंघटित कामगार मेटाकुटीला आले आहेत. त्यावर राज्य व केंद्र सरकारने त्वरित अंकुश लावून महागाई कमी करावी या मागणीसाठी भारतीय मजदूर संघाच्या वतीने दिनांक ९ मे २०२२ रोजी राज्यभर निदर्शने धरणा आंदोलन करण्यात येणार असून या आंदोलनात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कामगारांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन बांधकाम कामगार महासंघाचे प्रदेश अध्यक्ष हरी चव्हाण यांनी केले आहे.

भारतीय मजदूर संघाशी संलग्न असलेल्या बांधकाम कामगार महासंघ सिंधुदुर्ग जिल्हा अधिवेशन कणकवली गोपुरी आश्रम येथे संपन्न झाले. यावेळी व्यासपीठावर बांधकाम कामगार महासंघ प्रदेश संघटनमंत्री उमेश महाडिक,प्रदेश व केंद्र चिटणीस अभिजित केकरे,भारतीय मजदूर संघ जिल्हा अध्यक्ष विकास गुरव,सचिव सत्यविजय जाधव,कार्याध्यक्ष भगवान साटम,प्रदेश कार्यकारणी सदस्या अस्मिता तावडे,कोषाध्यक्ष सुधीर ठाकूर,व पदाधिकारी उपस्थित होते. आज मोलमजुरी करणाऱ्या सामान्य कामगारांना व गोरगरीब जनतेला जीवनावश्यक घटक अन्नधान्य, प्रवास, शैक्षणिक खर्च,औषध उपचाराचा खर्च,भागविणे जिकीरीचे झाले आहे.केंद्र व राज्य सरकारने जीवनावश्यक वस्तूच्या किमती त्वरित कमी करून गोरगरीब असंघटित कामगारांना व जनतेला राहत द्यावी या मागणीसाठी ९ मे रोजी जिल्हाधिकारी व प्रांत कार्यलया समोर आंदोलन करून केंद्र व राज्य सरकारला जागे करण्याचे आवाहन श्री चव्हाण यांनी केले आहे.या अधिवेशनास जिल्ह्याभरातून गाव प्रतिनिधी व कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You cannot copy content of this page