प्रमुख ४ संघटनांमधील नगरपालिका कर्मचारी २ मे पासून बेमुदत संपावर

मालवण दि प्रतिनिधी राज्य शासनाने वेळोवेळी नगरपरिषद, नगरपालिका कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांबाबत दुर्लक्ष केल्याने अनेक वर्षांपासून कार्यरत असलेल्या संघटना महाराष्ट्र राज्य नगरपरिषद कर्मचारी समन्वय समिती , नगरपरिषद, महानगरपालिका कर्मचारी महासंघ (भारतीय मजदूर संघ), महाराष्ट्र राज्य नगरपरिषद, नगरपंचायत कर्मचारी / संवर्ग कर्मचारी संघटना, राज्य म्युन्सिपल एम्प्लॉईज युनियन या महाराष्ट्रातील सर्व मुख्य चार संघटनांचे नगरपरिषद कर्मचारी २ मे पासून सर्व अत्यावश्यक सेवेसह बेमुदत संपावर जाणार असून मालवण नगर परिषदेचे कर्मचारीही या बेमुदत संपात सहभागी होत असल्याची माहिती राज्य नगरपरिषद, नगरपंचायत कर्मचारी / संवर्ग कर्मचारी संघटना, मालवण नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी दिली आहे.

पत्रकात म्हटले आहे की, या संपात सहभागी होताना मालवण शहरातील नागरिकांना त्रास देण्याचा हेतू नगरपरिषद कर्मचाऱ्यांचा नाही. परंतु हेतुपुरस्सर दुर्लक्ष करणाऱ्या शासनाचे लक्ष वेधण्यासाठी लोकशाहीच्या सनदशीर मार्गाने संप करावा लागत आहे. होणाऱ्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो, अशा शब्दांत राज्य नगरपरिषद, नगरपंचायत कर्मचारी / संवर्ग कर्मचारी संघटना, मालवण नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

You cannot copy content of this page