प्राथमिक शिक्षक समिती मालवण तालुकाध्यक्ष पदी सुयोग धामापूरकर यांची निवड

मालवण ता.३०-:* महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती तालुका शाखा मालवणचे त्रैवार्षिक अधिवेशनात समितीची मालवण तालुका कार्यकारिणी जाहिर करण्यात आली. यामध्ये तालुका अध्यक्ष पदी सुयोग धामापूरकर यांची निवड करण्यात आली.

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती तालुका शाखा मालवणचे त्रैवार्षिक अधिवेशन नुकतेच पोईप- विरण येथील इंदिरादेवी वर्दम हायस्कुल येथे संघटनेचे जिल्हाध्यक्ष नितीन कदम यांच्या अध्यक्षतेखाली व उद्घाटक संघटनेचे राज्य उपाध्यक्ष राजन कोरगावकर, ज्येष्ठ सल्लागार भाई चव्हाण, जिल्हा सरचिटणीस सचिन मदने यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. यावेळी सन २०२२ ते सन २०२५ या पुढील तीन वर्षाकरिता मालवण तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यामध्ये मालवण तालुका अध्यक्ष सुयोग धामापूरकर, उपाध्यक्ष महादेव असरोंडकर, सचिव जीवन हजारे, कार्याध्यक्ष रुपेश गरूड, कोषाध्यक्ष राजेंद्रप्रसाद गाड, शिक्षक नेते मंगेश कांबळी, प्रवक्ता नवनाथ भोळे यांची निवड करण्यात आली. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन रामचंद्र कुबल व समिक्षा सर्पे तर आभार नवनाथ भोळे यांनी मानले.

You cannot copy content of this page