*⚡बांदा ता.३०-:* येथील श्री बांदेश्वर सेवा -सुविधा केंद्राच्या वतीने बांदा शहरात १ मे रोजी भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये तात्काळ नेमणूक पत्र देण्यात येणार आहे.
गोव्यातील नामांकित कंपन्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील युवक व युवतीना रोजगार मिळवून देण्यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. दहावी, बारावी, आयटीआय, पदवी धारक मुले व मुली यांनी सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत हॉटेल सारा, ओवेस कॉम्प्लेक्स दुसरा मजला बांदा येथे उपस्थित राहावे. मुलाखतीसाठी येताना उमेदवारांनी दोन प्रतीत बायोडाटा घेऊन येणे आवश्यक आहे. याठिकाणी कंपनीचे अधिकारी प्रत्यक्ष जाग्यावर येऊन मुलाखतीतून उमेदवारची निवड करणार आहेत. अधिक माहितीसाठी निलेश मोरजकर ९७६३७१७७९०, प्रशांत गवस ८७६६५६४५४९, समीर परब ९८२३७९०११९ यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
